BREAKING NEWS

Saturday, June 10, 2017

बच्चु कडुंवर कडक कारवाई करा - भाजपाची मागणी

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )


शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबतच्या एका सभेत मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिल्यामुळे शांतता व सुव्यवस्थेला मोठा धक्का बसला असुन बच्चु कडुंवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर बॉम्ब फोडू," असे एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे जनभावना भडकल्या आहे. यामुळे उद्रेकसुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बच्चु कडुंवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ठाणेदार यांना देण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रमोद नागमोते, उत्तमराव ठाकरे, रविंद्र उपाध्ये, विलास तांडेकर, गुड्डु बजाज, नगरसेवक संजय मोटवानी, संदिप सोळंके, अभिजीत तिवारी यांसह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.