BREAKING NEWS
Showing posts with label चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान ). Show all posts
Showing posts with label चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान ). Show all posts

Wednesday, May 3, 2017

शालेय जीवनासाठी शिबिर महत्वाचे - नगराध्यक्ष श्री निलेश सूर्यवंशी <><> पी.के.एम. शिबिराचे उद्घाटन

चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )



केवळ रिकामा वेळ आहे म्हणून किंवा छंद जोपासण्यासाठी म्हणूनच नाही तर शालेय जीवनातही उन्हाळी शिबिराला फार महत्व आहे. त्यामुळे पालकांनी या संधीचा उपयोग करुन  घ्यावा असे मत स्थानिक नगर परीषदेचे युवा  नगराध्यक्ष शिट्टू उर्फ़ निलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.  पीपल्स कला मंच व सर्व शिक्षा अभियान गट साधन केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित नाट्य अभिनय शिबिरात ते बोलत होते.



        1 मे ते 10 मे 2017 या कालावधीत पी.के.एम. उन्हाळी शिबिराचे आयोजन स्थानिक गट साधन केंद्र येथे करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल अन्देलवार, सहाय्यक गट विकास अधिकारी कु. माडकर, नगरसेवक संजय मोटवाणी, वैभव गायकवाड़, संस्थेचे संस्थापक सिद्धार्थ भोजने, गट शिक्षणाधिकारी अशोक इंगळे, विस्तार अधिकारी चव्हाण, विषयसाधन व्यक्ति विवेक राऊत, मंगेश उल्हे आदी उपस्थित होते. सदर शिबिर हे विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखण्याचे काम करीत असून शहरातील अनेकांना या शिबिरामुळे दिशा मिळ्याल्याचे संजय मोटवाणी यांनी सांगितले. तर प्रत्येक विद्यार्थी शिकतोच यावर आपला पूर्ण विश्वास असून त्या साठी च आम्ही साधन व्यक्ति काम करीत असल्याचे विवेक राऊत यांनी व्यक्त केले. सभिव्यक्ति यासाठी उन्हाळ्यातील हा सुट्यांचा चांगला उपयोग होउ शकतो मुलांमधील  सुप्त गुण ओळखण्यासाठी पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भोजने यांनी केले.     कार्यक्रमाचे सुत्रबध्द संचलन गुल्नाज पठान हिने केले. यावेळी पी.के.एम.चे राहुल जगताप, रोहित तिजारे, ऐजाज हुसेन, अंकुर धाकुलकर, सूरज खरीले, पवन वाघ, तेजस लहाने, आकाश चव्हाण, अंजली चव्हाण, प्रशांत बैस, तेजस इमले, वैभव देशमुख, ऋषिकेश शेंडे आदी परिश्रम घेत आहे.

Wednesday, December 28, 2016

मोबाईलचे खेळ सोडून मैदानाकड़े वळा - श्री प्रवीण घुईखेडकर - धनोडी येथे शालेय क्रीड़ा स्पर्धेचे उद्घाटन

चांदुर रेल्वे :- (शहेजाद खान )



 आज एंड्राइड मोबाईल शाहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहचले आहे. मोठ्यांपासून ते लाहन्यापर्यंत या मोबाईल चे वेड लागले आहे परंतु विद्यार्थ्यांनी मोबाईलचे खेळ सोडून मैदानी खेळा कड़े वळने गरजेचे आहे व त्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रेरित करावे असे मत जि. प. सदस्य प्रवीण घुईखेड़कर यांनी व्यक्त केले.
      जि. प. धनोडी व घुईखेड केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीड़ा स्पर्धेचे मंगळवारी धनोडी येथील मुकनीराम गांधी महाविद्यालयात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पं. स. चे सभापती किशोर झाड़े, जि. प. सदस्य उमेश केने, पं.स. सदस्य डॉ सतीश देशमुख,  गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, सरपंच मेश्राम, राऊत, विषय साधनव्यक्ति विवेक राऊत आदी उपस्थित होते. तालुका शैक्षणिक दृष्टया प्रगत होत आहे सर्व शिक्षक गुणवत्तेसाठी धडपडत आहे, गुणवत्ता ही केवळ वर्गा पुरतीच् मर्यादित न ठेवता खेळात ही गुणवत्ता दिसून यावी असे नियोजन शिक्षकांनी करावे असे मत विस्तार अधिकारी अशोक इंगळे यांनी व्यक्त केले. तर टीवी मोबाईल सोडून मैदानी खेळा कड़े लक्ष देण्याचे आवाहन सभापती झाड़े यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख नारायण अतकरे यांनी तर आभार केंद्रप्रमुख कावळे यांनी मानले. यावेळी सुपलवाडा  येथील जि.प. शाळेची विद्यार्थिनी काजल बांते हिने निदर्शन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घुईखेड व धनोडीच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.