BREAKING NEWS

Friday, March 18, 2016

१७ एप्रिल रोजी चांदूर रेल्वे नगर पालीकेची पोटनिवडणूक प्रभाग क्र.४ मध्ये ओबीसी महिला नगरसेवक पदासाठी निवडणूक, माजी नगराध्यक्षांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-चांदूर रेल्वे न.प.च्या प्रभाग क्र. ४ मध्ये ओबीसी महिला नगरसेवक पदाची निवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी होणार आहे. कॉग्रेसचे माजी नगराध्यक्ष सौ अंजली अग्रवाल यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने ही पोट निवडणूक होत आहे. १७ मार्च पासून या पोट निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. १७ ते २२ मार्च पर्यंत नामनिर्र्देशन पत्र देणे व स्विकारण्याची प्रक्रिया होणार आहे. २३ मार्चला नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशीत झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. ४ एप्रिल नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतीम दिवस असेल. त्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देणे व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. ज्या ठिकाणी अपिल असेल तेथे त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किवा तत्पुर्वी अर्ज मागे घेता येईल व त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
 http://vidarbha24news.com/ShowNews.aspx?id=1978
 ११ एप्रिल रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्यात येईल. १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३०ते ५.३० पर्यंत प्रत्यक्ष मतदान आणि १८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मतमोजनी होणार आहे. 🔸 केवळ एका अर्जाची उचल 🔸 १७ मार्च पासून नामनिर्र्देशनपत्र देणे व स्विकारणे प्रक्रिया सुरू झाली. १७ मार्चला एकही अर्ज उचलला गेला नाही तर १८ मार्चला केवळ एका नामनिर्देशनपत्राची उचल झाली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.