BREAKING NEWS

Wednesday, October 12, 2016

हजारोंच्या उपस्थितीत ५० फुट उंच झेंड्यांना नविन खोळ चढविली


अवधुत बुवा देवस्थानात चंदनउटीचा कार्यक्रम
 
तिनशे वर्षापूर्वी कृष्णाजी महाराज यांनी सावंगा विठोबा येथे अवधुती संप्रदायाची स्थापना

विजयादशमी निमित्त सावंगा विठोब्यात भरली यात्रा
 
 
 

चांदूर रेल्वेः/शहेजाद खान :--- 



 
संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेले चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील कृष्णाजी महाराज देवस्थानात विजयादशमी चा  दिवशी अवधुत बुवा यांची समाधीला व झेंड्यांना चंदनउटीचा कार्यक्रम तसेच ५० पुâट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढविण्याचा भव्य कार्यक्रम भजनाच्या अखंड गजरात उत्साहात पार पडला. यावेळी हजारोंनी अवधुत बुवा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
तिनशे वर्षापूर्वी कृष्णाजी महाराज यांनी सावंगा विठोबा येथे अवधुती संप्रदायाची स्थापना करून समानेतेची शिकवण देत देव व भक्ताना समान दर्जा दिला. त्याचे प्रतिक म्हणून मंदिरात ५० फुट  उंच दोन झेंडे आहेत. कृष्णाजी महाराज यांचे अवधुत भजन लिखीत नसले तरी परंपरने भक्ताच्या मुखगत असून समाज प्रबोधन करणारे आहेत. प्रत्येक अमावश्येला देवस्थानामध्ये चंदनउटीचा कार्यक्रम घेण्यात येतो. विजयादशमी चा  दिवशी अवधुत महाराज यांची समाधी व झेंडयाना चंदनउटीचा कार्यक्रम घेण्यात आला. केशर, अष्टगंध, दही, दुध, शहद, तुप, तीळ, अत्तर, कस्तुरी यांचे मिश्रण करून चंदन खोड घासून चंदनउटी तयार करण्यात येते. या चंदन उटीचे गडवे, कापुर ज्योत, महापुजा ताट, हाराची पुâलारी, स्वच्छ पाण्याचा घडा, धुपारणे, अगरबत्ती व गलप आदी साहित्याने देवस्थान विश्वस्तांनी चंदनउटी कार्यक्रमाला सुरूवात केली. प्रथम कृष्णाजी महाराज यांची समाधी, ईश्वर पुनाजी व भक्तांची समाधी, देव व भक्ताचे समानतेचे झेंडे, लहान मंदिर व मोठे मंदिरात स्नान घालून चंदन उटीने पुजा करून अवधुत बुवांच्या समाधीवर चादर चढविण्यात आली. पानाचा विडा व साखर, सुपारी ठेवून व पुष्पहार, पुष्प अक्षता अर्पण करून सामुहिक आरती घेण्यात आली. यावेळी अखंड कापूर ज्योत प्रज्वलन व सामूहिक अवधूती भजनाची मांड सुरू होती. सुमारे अडीच तास ही पूजा विधी शिस्तीत पार पडली. दुपारी चार वाजता समानतेचे प्रतिक ५० फुट उंच दोन उंच झेंडयाना नवीन खोळ चढविण्याचा कार्यक्रमाला सुरूवात झाली. अवधुत भक्त चरणदास कांडलकर यांनी पदस्पर्श न करता दोन्ही झेडयांची जुनी खोळ काढून नवीन खोळ चढविली. हा अविस्मरणीय क्षण हजारोंनी डोळयात साठवुन ठेवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठोबा देवस्थान अध्यक्ष गोविंदराव राठोड, उपाध्यक्ष हरिदास सोनवाल, सचिव वामनराव रामटेके, दिनकर मानकर, दत्तुजी रामटेके, रूपसिंग राठोड, विनायक पाटील, पुंजाराम नेमाडे, कृपासागर राऊत, दिगांकर राठोड, अनिल बेलसरे, स्वप्निल बबनराव चौधरी यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.