अमरावती / विशेष प्रतिनिधी -
व्याख्यानात आपले मत व्यक्त करताना युवा व्याख्याते श्री सोपान कनेरकर |
समकालीन समस्यांची उकल करण्याचे विलक्षण सामर्थ्य संत वाङ्मयात आहे. ग्रामस्थांमध्ये शिक्षणाचा प्रसार होत असता सर्वांना जीवनशिक्षण आधीच मिळाले पाहिजे. तरच आदर्श ग्रामस्थ म्हणून त्यांना मान्यता मिळेल व गावाचे जीवनच पार पालटून जाईल. त्यासाठी महिलोन्नती होणे आवश्यक आहे. संसारात आई-पत्नी-बहिण-मुलगी म्हणून स्त्रीचे स्थान केंद्रीभूत आहे. तिचा अधिकार फार मोठा कारण संतांनाही स्वत:कडे माऊलीरूप घेतलेले आहे. बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या आणि वार्धक्यात पुत्राच्या नियंत्रणाखाली सातत्याने असणार्या स्त्रीकडे पाहण्याचा दृीकोन विशाल आणि उदार आहे. त्यांच्या अवलोकनातून त्यांना समाजजीवनाचे जे दर्शन घडले त्यातून त्यांना स्त्रीकार्यक्षमतेची जी प्रचीती आली ती म्हणजे स्त्री ही पुरूषांपेक्षा किंचितही व कशातही कमी नाही. "स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची 'माता' आहे. स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यात आहे" असे प्रतिपादन युवा व्याख्याते व संत साहित्याचे अभ्यासक सोपान कनेरकर यांनी लोणी येथे श्री संत मुंगसाजी माऊली पुण्यतिथी निमीत्त आयोजीत "संत वाग्मय" व महिलोन्नती' या विषयावर जाहीर व्याख्यान प्रसंगी केले.
यावेळी भागवताचार्य श्री योगेशानंदजी महाराज, श्री भूषनजी चांडक, सौ किरणताई कनेरकर , श्री निंभोरकरजी, श्री गौरव महाराज पाचघरे, ऋषीकेशजी बाजड, कुणालजी भेले व प्रचंड महिलाशक्ती युवक व युवती उपस्थित होत्या.
यावेळी श्री कनेरकर पुढे म्हणाले, भारतीय तत्वाज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभुत सुविधा व समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरूष दैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या शक्तीची, त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची.
स्त्री आणि पुरूष यांच्यात केवळ शरीरभेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील, श्रध्दावंत आहे, तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरूषाचे लक्ष्य मात्र भौतिकतेकडे, जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते.
सांप्रतकाळात सामाजिक स्थित्यंतराचा स्त्रियांवरही बर्याच प्रमाणात परिणाम झाला. प्राचीन काळी चार भिंतीत बंदिस्त असणारी स्त्री समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेने झळाळू लागली.
सांप्रतकाळात सामाजिक स्थित्यंतराचा स्त्रियांवरही बर्याच प्रमाणात परिणाम झाला. प्राचीन काळी चार भिंतीत बंदिस्त असणारी स्त्री समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेने झळाळू लागली.
समाजजीवनाच्या विकासात पुरूषांप्रमाणे स्त्रियांचाही बरोबरीचा वाटा आहे. आणि म्हणूनच कोणताही देश किंवा राष्ट्र स्त्रीजातीला मागे ठेवून प्रगतीपथावर पदार्पण करू शकत नाही. , मिळो बहुमान मातांना | जसा देशात पुरूषांना ॥ .स्त्री आणि पुरूष हे परस्परांच्या सहकार्याने परस्परांचा जीवनपथ सुकर करणारे समाजजीवनाचे परस्परावलंबी घटक आहेत.
तुकडोजी महाराज म्हणतात,
स्त्री-पुरूष ही दोन चाके | परस्पर पोषक होता निके |
गाव नांदेल स्वर्गीय सुखे | तुकड्या म्हणे ॥
Post a Comment