BREAKING NEWS

Saturday, March 25, 2017

पथनाट्यातून साकारले पाणी बचत व मुलगी वाचवाचे वास्तव चित्रण


जिल्हा प्रतिनिधी :- महेंद्र महाजन जैन






वाशीम - भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाईची दाहकता तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज पथनाट्याव्दारे सादर करुन वाशीम येथील नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी अप्रतिम कला सादर केली. 23 मार्च रोजी तालुक्यातील सुरकंडी येथे जागृती सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने वार्म मिशन अंतर्गत समारोपीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होत. यावेळी सदर विद्यार्थीनींनी आपल्या कलेचा अविष्कार घडविला.   
    जागृती सेवा केंद्राच्या वतीने पंचाळा गट ग्रामपंचायत मधील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु, मोहगव्हाण या गावांमध्ये पाणी वाचवा, मुलगी वाचवा, शेती व शेतकरी कसा समृध्द होईल याबाबत वार्म मिशन राबविले गेले. या मिशनचा समारोपीय कार्यक्रम सुरकंडी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील पुंजाजी भोयर हेाते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेसचे समाजविकास अधिकारी मुकुंद देशमुख होते. यावेळी मंचावर सरपंचा सौ. सुरेखा डुबे, नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या प्राचार्या रजुला, शिक्षीका कॅरोलीन, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, सतिश डुबे, ईमाम दर्गीवाले, तंटामुक्ती अध्यक्ष उस्मान भवानीवाले, मुख्याध्यापक ताकवाले, पिरुभाई बेनिवाले, जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता डिसुजा आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
    यावेळी नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी विविध प्रकारचे पथनाट्य बहारदारपणे सादर करुन भविष्यात पाणीटंचाई किती उग्र रुप धारण करु शकते याची प्रचिती गावकर्‍यांसमोर मांडली. तसेच मुलींना वाचविण्याची गरज नाटकाव्दारे सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. या विद्यार्थीनींनी तब्बल दोन तास गावकर्‍यांना खिळवून ठेवले. यावेळी जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता यांनी गावात निस्वार्थपणे राबवि लेल्या जाणार्‍या मिशनची माहिती दिली. पथनाट्य सादरीकरणाचे सुत्रसंचालन खुशबु गुल्हाने या विद्यार्थीनीने केले तर एकूण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन भोयर यांनी मानले. यावेळी गावातील जि.प. शाळा डिजीटल करण्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला गावकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद देत लोकवर्गणी जाहीर केली. या कार्यक्रमाला शेकडो नागरीक उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.