सातारा-
खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचे धारिष्ट्य असावे लागते. ते
सनातन्यांच्यात नाही. त्यामुळे सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद
करावे, असा फुकटचा सल्ला प्रा. डॉ. एन्.डी. पाटील यांनी दिला आहे.
कराड शहरातील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक
प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी विवेकवाद आणि विवेकवादाची हत्या या विषयावर
ते बोलत होते. प्रा. डॉ. एन्.डी. पाटील पुढे म्हणाले की,
१. जन्मत:च कुणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो. माणूस हा विचार करणारा प्राणी असून स्वत:च्या सृजनशक्तीच्या जोरावर तो समाजाला पुढे नेतो.
२. जो समाजाला हत्यारा बनवतो तो प्रत्येक प्रश्नावर शंका घेत असतो.
३. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकमधील प्रा.
कलबुर्गी या सर्वांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रसंगी त्यांना
प्राण गमवावे लागले.
४. सध्या विचारवंतांचे विचार दाबण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे
विवेकवादाचा विचार पुढे नेण्याचे दायित्व सर्वांचेच आहे. विचारांचा सामना
विचारांनीच केला पाहिजे. माणसे मारून विचार संपत नसतात.
५. पोलिसांची कार्यक्षमता कुठे आहे ? आज डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला तीन
वर्षे लोटली, तरी मारेकरी सापडत नाहीत. हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैवच
म्हणावे लागेल.
Post a Comment