श्री प्रमोद नैकेले / अचलपूर /-
अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील विश्वरूमप साप्ताहिकाच्या संपादिका रूपाली बुले यांची अखील भारतीय ग्रमिण पत्रकार संघ महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली.त्या जनकल्याण बहुउद्देशीय संस्था परतवाडा येथे कार्य करतात जुळ्या शहरातील महिला पत्रकार म्हणुन कार्य करतांना विविध सामाजिक संस्थेसोबत सामाजिक कार्यात त्या सहभागी होतात.अखील भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला प्रदेश मंच महिलांच्या समस्येवर कार्य करत असून रूपाली बुले यांच्या कडून या कार्याला गती मिळेल अश्या शब्दांत शहरातील ललित कांबळे तालुका अध्यक्ष,फिरोजखान अध्यक्ष अचलपूर पत्रकार संघ,मो.अझरूद्दीन सचिव,सुनिल देशपांडे,विलास थोरात,नितेश किल्लेदार,राजेंद्र शर्मा,राजेश डांगे व इतर पत्रकार सदस्यांनी अभिनंदन केले.
Saturday, March 25, 2017
महाराष्ट्र राज्य प्रदेश मंचच्या उपाध्यक्ष पदी रूपाली बुले यांची निवड
Posted by vidarbha on 9:54:00 PM in श्री प्रमोद नैकेले / अचलपूर /- | Comments : 1
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
congratulations.....
ReplyDelete