मागील निवडणूकीच्या वेळी होते १३७५ मतदार
निवडणूकीत बाबत पदवीधर मतदारात उदासीनता
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /----
राज्य निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नोंदनी कार्यक्रम घोषीत केला. या पाश्र्वभूमीवर चांदूर रेल्वे तालुक्यात केवळ ८० मतदारांची नोंदनी झाली असुन मागील निवडणूकीत १३७५ मतदार होते. त्या तुलनेत ही नोंदनी केवळ अत्यल्प म्हणजेच केवळ ५ टक्के आहे.
सर्वाेच्य न्यायालयाच्या निर्र्देशानुसार पदवीधर मतदार संघाची यादी सदोष असल्याचे कारणावरून ही यादी रद्द करण्यात आली व नव्याने यादी तयार करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाला दिले. आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी १ व १५ ऑक्टोबर अशा दोन वेळा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. आता २५ ऑक्टोबरला पुन्हा मतदार यादीत नाव नोंदनीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त जाहीर करणार आहे. त्यानुसार ५ नोव्हेंबर मतदार नोंदनीचा नमुना १८ स्विकारण्याचा अंतिम दिवस राहणार आहे. १९ नोव्हेंबरला हस्तलिखित तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिध्दी, २३ ते ८ डिसेंबर कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येतील.तर २६ डिसेंबरला दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे. ३० डिसेंबरला मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात अमरावती पदवीधर मतदार संघ मतदार नोंदनी बाबत जनजागृती करण्यासाठी एक बैठक बोलविण्यात आली. त्यामधे चांदूर रेल्वे तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकिय कार्यालय व सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधींना बोलविण्यात आले होते. नायब तहसीलदार (निवडणूक) प्रभाकर पळसकर व नायब तहसीलदार (निवासी) दिनेश बढिये यांनी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय, शासकिय व खाजगी कार्यालयातील पदवीधर कर्मचारी व समाजातील पदवीधर तरूण, तरूणी व इतर सर्व नागरिकांनी पदवीधर मतदार संघाचे मतदार म्हणुन नोंदनी करावी असे आवाहन केले. यावेळी मतदारांनी भरलेला अर्ज नमुना १८ गठ्ठयांनी स्विकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी नायब तहसीलदार (महसुल) श्रीकांत विसपुते, कारकुन अमोल ठवकर उपस्थित होते. या बैठकीला गटशिक्षणाधिकारी अशोक इंगळे, पत्रकार प्रभाकर भगोले, प्रा.रवींद्र मेंढे, सीसीएन न्युज चॅनलचे अमोल गवळी, भाजपचे रवी उपाध्ये तसेच शहर व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय व शासकिय कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अर्जासोबत पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिकासह इतर कागदपत्रे अनिवार्य
अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत मतदार म्हणून नोंद करण्यासाठी १ नोव्हेंबर २०१६ ला पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन तीन वर्ष पुर्ण झालेला पदवीधारकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदनी करता येईल. नोंदनीसाठी अर्ज नमुना १८, पदवी/पदविका प्रमाणपत्र, रहिवाशी पुरावे, छायाचित्र असे कागदपत्रे लागणार आहे. मतदार नोंदनीसाठी ५ नोव्हेंबर २०१६ अंतिम दिनांक राहणार आहे.
Post a Comment