BREAKING NEWS

Tuesday, October 25, 2016

श्री मधुकर आत्राम सह भाजप,नाविस व राकाॅ पक्षांचा शेकडो कार्यकत्यांचा आविस मध्ये प्रवेश​


राजेशाही ला सोडून लोकशाही च्या तत्वावर येणाऱ्या सर्व लोकांच आविस मध्ये स्वागतच- माजी आमदार श्री दीपकदादा  आत्राम


अहेरी :- /रंगय्या रेपाकवार /---


            मागील विधानसभा निवडणुकीत नवीन आमदारांना निवडून दिले परंतु त्यांचेकडून झालेली निराशा पाहता दोन वर्षापासून आमच्या कडे सतत केले दुर्लक्ष वर नाराजी व्यक्त करीत दिना चेरपल्लीसह महागाव,रामपूर,कनेपल्ली खमनचेरू,चिंतलपेठ या परिसरातील  गावातील शंभराचे वर  भाजप,नाविस कार्यकर्ते व राकाॅ कार्यकर्ते यांनी काल दिना चेरपल्ली येथील पटांगणात माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.चे कृषी सभापती अजय कंकडालवार यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवीत आविस मध्ये प्रवेश केला  राकाॅ कार्यकरता माजी सरपंच मधुकर आत्राम, व त्यांच्या पत्नी रेणुका आत्राम यांच  दिपक आत्राम व अजय कंकडालवार यानी आविस मध्ये प्रवेश देवुन त्यांचा शाल ,श्रीफळ देवून सत्कार केला .हा प्रवेश  पुढील जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडनुकीत आविस च्या विरोधकाना धक्का बसवनारा आहे.
    निवडणुकीच्या वेळी मोठे मोठे आश्वासन देऊन मागील दोन वर्षापासून विकास पूर्णं ठप्प झाला आहे. याला सध्याचे आमदार तथा पालकमंत्री ची निष्क्रीयता कारणीभूत असून महागाव,खमनचेरू,कनेपल्ली,रामपूर व चिंतलपेठ या परिसरातील गावातील भाजप,नाविस व राकाॅ कार्यकर्ते यांनी पक्षाला रामराम करीत आविस मध्ये प्रवेश केला.
लोकशाहीची सुरुवात होऊन  हि आजही राजेशाही त जीवन जगवणाऱ्या लोकप्रतिनिधीला सोडून आविस मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत आहे  विकास करण्यासाठी सामान्य माणूस धडपडत असलो तरी  विकास ला ब्रेक इथल्या राजकीय खेळी मुळे लागलं असून मी आमदार असताना कित्येक रस्ते, आंतरिक पूल, आन्तरराज्यीय पूल,तसेच विविध विकासात्मक कार्य त्या काळात झाले त्यामुळेच या गावातील रस्ते बदलेले दिसत आहे  आणि अश्याच विकासासाठी आपल्या आविस मध्ये प्रवेश करून विकासासाठी कार्य करता येईल म्हणून आविस मध्ये या असे आवाहन त्यांनी केले यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अजय कंकडालवार यांनीही उपस्थितीताना मार्गदर्शन केले. ..याप्रसंगी व्येकटरावपेठ सरपंच संपत सिडाम, इंदाराम सरपंच गुलाबराव सोयम  खमनचेरु  सरपंचा कु.सुनिता कुसनाके,देवलमारी सरपंच पेन्टूबाई पोरतेट,वांगेपली सरपंच अंजना ताई सिडाम,चिंचगुंडी सरपंच रमेश मडावी, माजी उपसरपंच अशोक येलमूले,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रामटेके, बंडू मोहूर्ले, दिवाकर वेलादी मंचावर उपस्थित होते. ...प्रास्ताविक गिरमाजी तलांडे यांनी केले .संचालन प्रकाश तलांडे तर आभार दीपक तलांडे यांनी मानले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.