![]() |
आंदोलनस्थळी बोलतांना ह.भ.प. श्री वणवे महाराज |
आंदोलनास वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. श्री वणवे महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ह.भ.प. श्री वणवे महाराज म्हणाले, चिनी वस्तू विकत घेतल्याने सगळा पैसे चीनला मिळतो. आपल्या देशबांधवांना त्याचा काहीही लाभ होत नाही. म्हणून महाग असल्या तरी केवळ स्वदेशात सिद्ध झालेल्या वस्तूंचाच उपयोग करायला हवा आणि चिनी बनावटीच्या वस्तूंवर जनतेनेच बहिष्कार घालायला हवा.
बाजारपेठेत मोकळी जागा उपलब्ध नसतांना मे. शैलेश इलेक्ट्रीकलचे मालक श्री. आशिष सुरुशे यांनी त्यांच्या दुकानासमोर आंदोलन करण्यास अनुमती देऊन सहकार्य केल्यामुळेच हे आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. आंदोलन स्थळी उपस्थित पोलिसांनीही आपले कार्य उत्तम असून असे कार्यक्रम पुढेही घ्या, आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
क्षणचित्र
मराठा क्रांती मूक मोर्च्याचे एक कार्यकर्ते आंदोलन झाल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांना भेटले आणि त्यांना आंदोलनातील विषय अतिशय आवडल्याचे आवर्जून सांगितले. मला तुमचे विषय व्हॉट्स अॅपवर पाठवत चला, मी ते आमच्या गटात टाकीत जाईन, असे सांगितले आणि लगेच समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या गटामध्ये सामील करून घेतले.
Post a Comment