मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची उपस्थिती
आजचा आंदोलनातील काही निवडक फोटो आपल्यापर्यंत देत आहोत
अमरावती /-- ५ टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज बांधव आज १८ तारखेला रस्त्यावर उतरले . जिल्हाधिकारी कार्यालयावर जमिअत उलमा या संघटनेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मुस्लिम समाजाचा विद्यमान सरकारकडून मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये होणार्या वाढत्या हस्तक्षेपाला विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते.पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. प्रमुख मंडळींनी यावेळी आपापले विचार यावेळी मंचावर व्यक्त केले

मुस्लिम आरक्षणाबाबत जमिअत उलेमा ए हिंद ने १९४८ पासून मागणी लावून धरली होती संघटनेने यासाठी २१ लाख लोकांची स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींनी निवेदन सादर केले होते. २ ऑक्टोबर २00२ साली या मागणीसाठी देशव्यापी जेलभरो आंदोलन झाले होते. संघटनेचे कार्यकर्ते त्यावेळी १४ दिवस करागृहात बंद होते. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळावे ही आमची मागणी फार जूनी असून यासाठी अनेकदा आंदोलन, स्वाक्षरी मोहीम आदी मार्गाने शासनाचे लक्ष्य वेधण्यात आले.१९४८ ते २0१६ पर्यंत केलेल्या दीर्घ आंदोलनाचा अहवाल आम्ही शासनाकडे सादर केला आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मिळायलाच हवे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लीम बांधवांचा विशाल अश्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.शांततेच्या मार्गाने होणार्या या आंदोलनादरम्यान पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किची काळजी घेतली गेली यावेळी उन्हाचा प्रचंड तडाखा असून देखील मुस्लीम बांधव मोठ्या चिकाटीने भर उन्हात रस्त्यावर बसून होते
Post a Comment