ग्राहकांचा सहा दिवसापासून लॅन्डलाईन फोन व ब्रॉडबॅन्ड बंद
तक्रार करूनही टेलीफोन सुरू केला नाही.
चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /-
एका ग्राहकाचा सहा दिवसापासुन लॅन्डलाईन फोन व ब्रॉडबॅन्ड बंद आहे. फोन व ब्रॉडबॅन्ड सुरू
करण्यासाठी ते स्थानिक बिएसएनएल कार्यालयाच्या चकरा मारून त्रस्त झालेल्या या
टेलीफोन ग्राहकाला चांदूर रेल्वेच्या बिएसएनएलच्या एसडीई वानखडे मॅडम म्हणतात ‘ फोन
बंद आहे, तर काय झालं ‘ असे बेजबाबदारपणाची उत्तरे एक मोठे अधिकारी ग्राहकांना देऊन
ग्राहक सेवेची वाट लावत असल्याचे दिसुन येत आहे.
सविस्तर वृत्त असे की स्थानिक इंदिरा नगरातील रहिवाशी रवींद्र मेंढे यांचा घरचा लॅन्ड लाईन
फोन व ब्रॉडबॅन्ड गुरूवार पासुन बंद आहे. तशी तक्रार मेंढे यांनी मोबाईल फोन वरून स्थानिक
बिएसएनएल कार्यालयातला शुक्रवारी सकाळी दिली. त्याला सहा दिवसाचा कालावधी
उलटला तरी त्यांचा लॅन्ड लाईन फोन मात्र सुरू झाला नाही. पाच दिवस उलटून फोन सुरू न
झाल्याने ग्राहक रवींद्र मेंढे प्रत्यक्ष सोमवारी कार्यालयात गेले. त्यावेळी जिटीओ वानखडे यांनी
मंगळवारी (ता.२५) ला दुपारी बारा पर्यंत आपला फोन सुरू होईल असे आश्वासन दिले. अडीच
वाजले तरी लॅन्ड लाईन फोन सुरू न झाल्याने मेंढे यांनी बिएसएनएल कार्यालयात फोन लावला.
त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या एसडीई वानखडे मॅडम यांना लॅन्ड लाईन सुरू न झाल्याबद्दल
व सहा दिवसापासून फोन बंद असल्याचे सांगीतले.एसडीई मॅडम यांनी हि बाब गंभीर न घेता
फक्त सहा दिवस तर झाले ना फोन बंद व्हायला असे बेजबाबदार पणाचे उत्तर दिले. मी तुमची
तक्रार पाहिली नसल्याचे त्यांनी सांगीतले. केंद्र सरकारने बिएसएनएलचे कंपनी म्हणुन निर्मिती
केली.तर कंपनीने फोन सेवा घेणाऱ्याना चांगली सेवा देता यावे याकरीता लठ्ठ पगाराचे
इंजिनिअर बसविले. मात्र हे इंजिनिअर ग्राहकांना तक्रारी न ऐकता व त्यांना दर्जेदार सेवा
देण्याऐवजी उलट त्यांना मनस्ताप देण्यासाठी बसल्याचे दिसुन येते. तर टेलीफोन कनेक्शन
व दुरूस्तीचे केबल कंत्राटदार मनमानीपणे कामे करून अनेक ग्राहकांना त्रास देत असल्याची
ग्राहकांची तक्रार आहे.
BSNL चा अशाच बेजवाबदार अधिकाऱ्यांमुळे इतर खासगी कंपन्यांकडे ग्राहक आपोआप वळतात -यात नवल ते काय - संपादक
Post a Comment