अमरावती :- VRAS विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, या मागणीला घेऊन येत्या ५ डिसेंबरला विदर्भातील नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून, विदर्भ सर्मथक ठिय्या आंदोलन देखील करणार असल्याची माहिती स्थानिक श्रमिक भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत समितेचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी दिली. आंदोलनासंदर्भात केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली गेली. मात्र केंद्र सरकारने त्याची अद्यापर्यंत दखल घेतली नसल्याचे वामनराव चटप यांनी सांगत प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांना या संदर्भात भेटण्यासाठी वेळ मागीतल्यावर तो देखील देण्यात आला नाही. एवढेच काय तर लेखी निवेदने आणि पत्रांना साधे उत्तर देण्याचे कष्टही सरकारला घेता आले नसल्याचे चटप म्हणाले. यावेळी श्री वामनराव चटप , रंजनाताई मामर्डे , आणि इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते

Post a Comment