चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
तालुक्यातील कारला येथील एका २३ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १ वाजता घडली. प्रतिक दिवाकर खरबडे (वय २३) असे त्या युवकाचे नाव आहे. कारला येथे जिल्हा परिषद निवडणूक मतदानाची धावपळ सुरू असतांना प्रतिक खरबडे याने सकाळी जि.प.निवडणूकीसाठी मतदान केले. त्यानंतर तो घरी परतला. दुपारी आई बाजुच्या घरी बसली असतांना त्यांने घराचे दार आतुन लावून घेतले व छताच्या नाटीला गळफास लावुन आत्महत्या केली. त्याची लहान बहिण घरी आली असता दार आतुन बंद होते. तीने शिडी लावुन दाराची कडी उघडली असता गळफास लावलेल्या अवस्थेत प्रतिक नजरेत पडला. प्रतिक हा अमरावती येथील गोळे इजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकत असल्याचे समजले. तो आईवडिलांना एकटा मुलगा असुन त्यांच्यापेक्षा लहान दोन बहिणी असुन त्या पदवीचे शिक्षण घेत आहे. प्रतिकच्या वडिलाकडे पाच एकर शेती आहे. प्रतिकेचे आत्महत्येमागील मात्र कारण समजु शकले नाही.
photo - File
Post a Comment