श्रीमती वैशाली देशपांडे पब्लिक स्कूल बिलनपूरा येथे संस्कार भारती,स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळी व पब्लिक स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे
आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये स्वा.वि.दा.सावरकर धगधगते अग्निकुंड या विषयावर शिवरायजी कुळकर्णी,भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते यांच्या व्याख्यानाने प्रारंभ होईल त्यानंतर २७ व २८ फेब्रुवारी ला अनुक्रमे प्रफुल्लजी माटेगावकर नागपूर सह्याद्रीतील सात रत्ने एक दृकश्राव्य आविष्कार एक संवाद गड कोटांशी व प्रा.डाँ.संतोषजी ठाकरे यांचे महानुभव पंथ साहित्याचा संदर्भ घेऊन ऐतिहासिक नगरी अचलपूरच्या गौरवशाली इतिहासावर आपले विचार मांडणार आहेत तरी या व्याख्यानमालेला उपस्थीत राहून आपल्या ज्ञानात भर घालावी असे मधुसूदन धानोरकर,अध्यक्ष,विठ्ठल गिरी,संगीता तुरखडे,निलेश तारे,विराज देशपांडे व समस्त कार्यकर्ते यांनी आवाहन केले आहे.
Post a Comment