BREAKING NEWS

Sunday, February 12, 2017

हजारोंनी घेतले श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन श्री संत एकनाथ महाराज जयंती महोत्सव, रात्री यात्रेकरूंना मिळाली नाटकाची मेजवानी


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-



आमला विश्वेश्वर येथील श्री संत एकनाथ महाराज जयंती महोत्सव दिनी लाखो भाविकांनी श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. आज दुपारी हभप महादेव माहुरे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर दुपारी झालेल्या महाप्रसादाचा हजारोंनी लाभ घेतला.या महोत्सवानिमित्त आमला येथे भव्य यात्रा भरली असुन यात्रा दोन दिवस चालणार आहे. तर शेकडोंनी रात्री नाटकांच्या मेजवानीचा आनंद लुटला.



संत एकनाथ महाराज जयंती महोत्सव निमित्त २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भागवत सप्ताह, सामुहिक ध्यान, प्रवर्चन, किर्तन, भजन, हरिपाठ व सामुदायिक प्रार्थना, खंजेरी भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ ९ पेâब्रुवारी ला सकाळी ११ वाजता वंदना व विठोबा देव्हारे(मुंबई) यांनी संत एकनाथ महाराजाच्या चांदीच्या पादूकांचे पुजन केले व दुपारी विश्वेश्वर मंदिर येथून श्री संत एकनाथ महाराजाची प्रतिमा व चांदीच्या पादुका सजविलेल्या रथात ठेवून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज (ता.१०) सकाळी ५ वा.सुरेंद्र बकाले यांचे सामुदायिक ध्यान व भाषण झाले तर दुपारी हभप महादेव माहुरे महाराजांचे काल्याचे किर्तन झाले.



त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून उच्चपदावर पोहचलेले जे.जे हास्पीटल, मुंबईचे एमबीबीएस.एमडी डॉ.गणेश बाबाराव बनसोड, सहा पोलीस निरीक्षक शुभांगी लक्ष्मण आगासे, पिएसआय कपिल उत्तम खेकडे, असि.इंजिनिअर गौरव अशोक डोंगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्यामध्ये हजारोंनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचे हजारो हात कामाला लागले होते. आमला विश्वेश्वर येथील लग्न होऊन सासरी गेलेल्या लेकी या महोत्सवा निमित्त माहेरी आल्यामूळे घर जनु आनंदाने फुलून गेली होती. तर यात्रेसाठी नातेवाईक आल्यामूळे प्रत्येकांचे घर पाहूण्याने भरले होते. यात्रेत विविध वस्तुंची दुकाने सजली होती. खेळणीचे दुकाने बच्चे कंपनीचे खास आकर्षण  ठरले होते. गृहपयोगी साहित्यांची दुकाने महिलांच्या गर्दींनी फुलून गेली होती.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.