BREAKING NEWS

Tuesday, March 14, 2017

चांदुर रेल्वे येथील कृषी अधिकारी कार्यालय वाऱ्यावर. - कृषी कार्यालयातील ठाकरे यांच्या प्रभारी राजमुळे शेतकरी वर्गात तिव्र नाराजी.

चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) -



शहरात तालुका कृषी कार्यालय असुन या कार्यालयात अधिकारी मात्र शेतकऱ्यांना सापडत नसल्याने कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित रहावे लागत आहे. तरीही याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध कामाच्या अडचणीच्या समोर जावे लागते.
         तालुक्यात विविध शासकीय कार्यालय आहेत. परंतु बऱ्याच विभागाचे अधिकारी कार्यालयात नसतात. अशातच शहरातील तालुका कृषी अधिकारी ठाकरे प्रभारी असल्याने त्यांचे मंडळ अधिकारी आणि कृषी सहायक यांच्यावर कुठलेच वचक राहिलेले नाही. या कार्यालयातील कर्मचारी  आप आपल्या सोईनुसार कामावर येतात. तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळत नाही. कारण जवाबदार अधिकारी कार्यालयात नसल्याने बाकी कर्मचारीही दिसत नाहीत. या कार्यालयात हा लपन छुपनीचा खेळ बऱ्याच दिवसापासुन चालत आहे. या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी मुख्यालयी न राहता एस.टी. बसच्या वेळापत्रकानुसार येणे जाणे करत असतात. या कार्यालयात कोन केव्हा येतो व कोन केव्हा जातो याचा मात्र पत्ता लागत नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांनी व पत्रकारांनी चौकशी केली असता साहेब बैठकीला जिल्ह्यावर गेले आहेत. व कृषी सहाय्यक खेड्याला साईडवर गेले असे सागण्यात येते.

कार्यालयातील कर्मचारांच्या अपडाउनमुळे लाभार्थी त्रस्त




कार्यालयातील अधिकारी आजुबाजुच्या परीसरातुन अप-डाऊन करतात. यांना कार्यालयात येण्यासाठी बारा वाजतात. कार्यालययात दुपार नंतर ग्रामीण भागातील गावांना भेट देण्याचे कारण सांगून कार्यालया बाहेर पडतात. यांच्या या लहरी कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी कार्यालयात आणि कर्मचारी आपल्या शहराकडे असा प्रकार पहावयास मिळत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहेत. पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. यामुळे या कार्यालयाविषयी तालुक्यातून शेतकरी वर्ग तिव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुका कृषी कार्यालयातील प्रभारी राजमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त राहिली नाही. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावून दररोज कार्यालयात वेळेवर हजर राहाण्याची सक्ती करावी. व स्वत: कृषी अधिकाऱ्यांनी देखील वेळेवर कार्यालयात यावे जेणेकरून  शिस्तबद्ध प्रमाणे कार्यालय चालेल व शेतकऱ्यांचे कामे वेळेवर होतील.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.