महेंद्र महाजन जैन / रिसोड -
श्रमिक पत्रकार संघाची नवनियुक्त कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी दिपक कुदळे,उपाध्यक्षपदी अर्जुन खरात व गोपाल खडसे तर सचिवपदी प्रा.विवेकानंद ठाकरे यांच्यासह इतर कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. श्रमिक पत्रकार संघाची बैठक रिसोड येथे आयोजित करण्यात आली होती.बैठकीसाठी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हाध्यक्ष नितीन पगार,राज्य सहसचिव नागेश घोपे व वरिष्ठ सदस्य अतिष देशमुख हे उपस्थित होते.तर तालुका कार्यकारिणीचे वरिष्ठ मार्गदर्शक संतोष गोमाशे,गजानन हजारे,किशोर गोमाशे,शितलकुमार धांडे,सतिष मांदळे, तुकाराम फुके, दत्तराव इंगळे,निनाद देशमुख हे हजर होते.बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.या बैठकीमध्ये मान्यवरांनी श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी सर्वानुमते अध्यक्ष,उपाध्यक्ष व सचिवांसह इतर कार्यकारिणी गठीत करण्यात आली.तालुकाध्यक्षपदी दिपक कुदळे,उपाध्यक्षपदी अर्जुन खरात व गोपाल खडसे,सचिव म्हणून प्रा.विवेकानंद ठाकरे,सहसचिवपदी संतोष चऱ्हाटे व अनंत भालेराव,कार्याध्यक्षपदी प्रा.रवी अंभोरे,प्रसिद्धीप्रमुख म्हणून शेख अन्सारोद्दीन,संघटक म्हणून महादेव घुगे,कोषाध्यक्षपदी काशिनाथ कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून गजानन गाडे,सुरेश गिरी,अशोक चोपडे,गणेश देगांवकर,गोपाल चोपडे,रुपेश बाजड,गिरीधर शेजुळ,दिनकर भगत,महेंद्र महाजन,युवराज भगत यांचा समावेश तालुका कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.कार्यकारिणी गठीत झाल्यानंतर सर्वांचा सत्कार मान्यवरांनी केला.
Wednesday, April 12, 2017
श्रमिक पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी दिपक कुदळे तर सचिवपदी प्रा.विवेकानंद ठाकरे उपाध्यक्ष पदी गोपाल खडसे व अर्जुन खरात
Posted by vidarbha on 8:46:00 PM in : महेंद्र महाजन जैन / रिसोड - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment