हिंदु राष्ट्राविषयी अशी ठाम भूमिका किती हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी घेतात ?
मुंबई – देहलीत हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्याने निधर्मीवादाचे (सेक्युलर) दफन होईल, अशी खात्रीच हिंदूंना होती; पण आपण आता संयुक्त राष्ट्र संघामध्ये (युनोमध्ये) जाऊन भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. ज्याचा कोणताही राजकीय धर्म नाही, असे भारताचे महाअधिवक्ता मुकुल रोहतगी यांनीच शासनाच्या वतीने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलतांना सांगितले. खरे तर हा देश म्हणजे हिंदु राष्ट्रच आहे. पुन्हा देशाचा आत्मा, संस्कार, संस्कृती ही शुद्ध हिंदुत्वाची आहे, हे ठासून सांगायला कुणाची भीती आहे, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या संपादकीयमध्ये केले आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की,
१. वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला देश भारत म्हणजे हिंदु राष्ट्रच मानायला हवे; पण फाळणीनंतर येथे जे मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला निधर्मी म्हणण्यातच धन्यता मानली.
२. आपण निधर्मीवादाची बांग देत असू, तर हा देश राम, कृष्ण आणि सोमनाथ यांचा उरणार नाही. हिंदु राष्ट्र म्हणजे इराणचे खोमेनी, अफगाणिस्तानातील तालिबानी आणि पाक-इराकमधील इसिस यांचे राज्य नाही.
३. हिंदु राष्ट्र म्हणजे येथे रहाणार्या सर्वांनी आपापल्या श्रद्धांची जपणूक करत हिंदु संस्कृतीचा स्वीकार करणे. हिंदु राष्ट्र याचा अर्थ मुसलमानांसह इतर धर्मियांनी या मातृभूमीला वंदन करावे, समान नागरी कायदा पाळावा, वन्दे मातरम्चा गजर करावा आणि धर्मांधतेचे जोखड फेकून द्यावे, असा आहे.
४. धर्म तुमच्या घरात ठेवा, मशिदी आणि चर्चमध्ये राहू द्या; पण बाकी सर्व आपण एकाच हिंदु राष्ट्राचे पाईक आहोत, अशी हिंदु राष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडायला हवी. युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे आणि अमेरिका, रशिया हे ख्रिश्चन राष्ट्र म्हणून अभिमानाने मिरवतात. ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमार यांसारखी राष्ट्रे बौद्ध धर्म घेऊन उभी आहेत; पण जगाच्या पाठीवर एकही हिंदु राष्ट्र नसावे, याची खंत आणि चीड ज्याच्या अंतरंगात नाही, तो हिंदू म्हणून जगण्यास लायक नाही.
५. हा देश निधर्मीवादाचा गुलामच रहाणार असेल, तर साबरमती एक्सप्रेसमधील रामसेवकांच्या बलीदानाला अर्थ उरणार नाही. गर्वसे कहो हम हिंदू है, असे राज्य सध्या देशात आले आहे, हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असतांना आम्ही अचानक निधर्मी (सेक्युलर) कसे
झालो ? या शासनावर १०० कोटी हिंदूंच्या वतीने फसवणूक आणि अब्रुहानी यांचा गुन्हा प्रविष्ट व्हायला हवा !
झालो ? या शासनावर १०० कोटी हिंदूंच्या वतीने फसवणूक आणि अब्रुहानी यांचा गुन्हा प्रविष्ट व्हायला हवा !
Post a Comment