Sunday, June 25, 2017
त्या प्रकरणातील दोन पत्रकारांना २७ जुन पर्यंत न्यायालयीन कोठडी - चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला घेराव व दगडफेक प्रकरण
Posted by vidarbha on 4:36:00 PM in | Comments : 0
चांदूर रेल्वे /शहेजाद खान -
तालुक्यातील मोगरा येथील अल्पवयीन युवतीच्या आत्महत्येनंतर आरोपीच्या अटकेसाठी ४००-५०० लोकांच्या जमावाने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला घेराव घातला.रात्रीचे साडेअकरा उलटून आरोपीला अटक न झाल्याने संतप्त जमाव बिथरला. त्यात पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामूळे जमावाने दगडफेक केली. या प्रकरणी चादूंर पोलीसांनी १८ जणांना ताब्यात घेवून गुन्हे दाखल केले. त्यामध्ये सुडात्मक कारवाई करीत दोन पत्रकारांना चांदूररेल्वे पोलीसांनी नाहक गोवले. त्या दोन पत्रकारासह अन्य एकाची तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने चांदूर पोलीसांनी आज (ता.२३) स्थानिक न्यायालयात हजर केले.
www.vidarbha24news.com
न्यायालयाने त्या तिघांना २७ जुन पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. चांदूर रेल्वे स्टेशनवर मोगरा येथील१७ वर्षीय ईश्वरी बबन थेटे हिने शनिवारी दुपारी रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला दोषी असणाऱ्या आरोपीला त्वरीत अटकेची गावकऱ्यांची मागणी होती. घटनेनंतर तब्बल नऊ तास उलटून कारवाई न झाल्याने संतप्त जमावाने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला घेराव घातला. अशातच पोलीसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. त्यामूळे संयम सुटलेल्या जमावाने दगडफेक केली. यात पोलीसांच्या गाडीच्या काचा फुटल्या . पोलीसांनी मृतकाच्या नातेवाईकासह १८जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रानिक मीडियाचे पत्रकार प्रशांत कांबळे, प्रिंट मीडियाचे अभिजित तिवारी यांचा समावेश आहे. न्यायालयाने पत्रकार प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी व पप्पु भालेराव यांना २३ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. २३ जुनला पोलीस कोठडी संपल्याने त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. यावेळी अॅड.दुबे यांनी आरोपीला जमानत मिळावे यासाठी प्रयत्न केले. मात्र यावेळी चांदूर रेल्वे पोलीसांनी रमजान ईदचे कारण न्यायालयापूढे केल्याने त्यांचा जामीन नाकारत त्या तिघांना २७ जुन पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असुन त्यांची रवानगी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment