महेन्द्र महाजन जैन रिसोड (वाशिम )
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे शेतकरी संपात शिवसेनेने उडी घेतली असून आज शिवसेनेच्या वतीने लोणी फाट्यावर रस्ता रोको करण्यात आला तर उदया मालेगाव व रिसोड बंद ची हाक देण्यात असली आहे . महाराष्ट्रात 1 जून पासून शेतकरी संपावर गेला आहे. त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन पेटले आहे .विविध प्रकारे शेतकरी शासनाचा निषेध नोंदवत आहेत ,.आज रिसोड येथे शिवसेना आक्रमक झाली शेतकरी संपात उडी घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ सानप यांच्या नेतृत्वात लोणी फाट्यावर रास्तारोको केला .शेतकऱयांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे शेतमामालास हमी भाव मिळालाच पाहीजे अशा प्रकारची घोषणाबाजी केली शिवसेनेने आंदोलन तीव्र करत 7 जून ला रिसोड मालेगाव बंद ची हाक दिली आहे. रस्ता रोको आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथजी सानप यांच्या नेतृवात तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे, शहर प्रमुख अरूण मगर ,युवासेना तालुका प्रमुख अँड.गजानन अवताडे, पंचायत समिती सदस्य नंदू घुगे शिवाजी सोनुने आदींसह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला
Post a Comment