धामणगाव रेल्वे / श्री मंगेश भुजबळ -
दोन एकर जमिनीच्या भरवशावर उपजीविका व मोलमजुरी करून स्वतः चे पोट भरणाऱ्या कुटुंबातील पुनम ने दहावीच्या परीक्षेत गुणवंतांच्या यादीत नाव मिळविल्याने विद्या ही श्रीमंती पाहून येत नसून चैतन्याचा रूपाने कुशाग्र बुद्धीला पाहून मातीच्या घरातही येते याचा प्रत्यय आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा मार्च २०१७ च्या परीक्षेचा निकाल नुकताच हाती आला आहे या निकालात हिराबाई गोयंनका कन्या विद्यालयात शिकणाऱ्या पुनम रमेशराव काळे हिला ९१% गुणांक मिळाले आहे.तालुक्यातील विरुळ रोंघे येथे राहत आलेल्या पुनमचे वडील आपल्या दोन एकर शेताचे व मोलमजुरीवर हालाकीच्यां परिस्थितीत आपल्या कुटूंबियांचा सांभाळ करीत आहे.पुनमला मोठी बहीण,लहान भाऊ,आई वडील असा परिवार आहे.कोणतीही शिकवणी नसताना वेळोवेळी पुस्तकांचाही अभाव असतांना पुनमने प्राप्त केलेल्या यशाचा कुटुंबासह संपूर्ण गावाला तिचा अभिमान असल्याचे गावकरी बोलत आहे.
ग्रामीण भागातुन सोइ सुविधानचा अभाव असताना कोणतेही पोषक वातावरण विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यातही शिक्षणाच्या व्यापरिकरणांने लागणार खर्च सामान्य कुटूंबाणच्या आवाक्या बाहेर असतो तरीही संघर्षाची लढाई करीत शेतकरी आपल्या मुलांना कसाबसा शिकवतो अन यात मुलीने मिळविलेले घवभावीत यश आई वडिलांना आकाशा इतका आनंद देऊन जातो हाच आनंद आज पुनम च्या कुटुंबियांत दिसून येत आहे व पूनमने तिचा यशाचे श्रेय वडील व शिक्षक वर्गाला दिले आहे
पुनमला डॉक्टर व्हायचे आहे
पुनम काळे ९१% घेऊन उत्तीर्ण झाल्या नंतर पुढे डॉक्टर होण्याचे स्वन मनाशी बाळगून पुढील वाटचाल करणार असल्याचे तिने बोलून दाखवले आहे मात्र संघर्षातून शिक्षणाची वाटचाल करण्यासाठी तिला जिद्दीने अभ्यासाची व कुटुंबाला अथक परिश्रमाची गरज पडणार आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
भाजप नेते अरुंभाऊ अडसड व नगर परिषदचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी पुनमचे कौतुक केले व धामणगाव रेल्वे पंचायत समिती सभापती सचिन पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे
Post a Comment