शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला प्रथम |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १३ जून रोजी दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित झाला. यामध्ये स्थानिक नगर परीषद आझाद उर्दु हायस्कुलचा निकाल १०० टक्के लागला असुन शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला प्रथम तर अर्शिया कौसर व्दितीय व राहेमीन अंजुम ने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. अगोदरच विलंब झालेल्या या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून होते. यामध्ये स्थानिक नगर परीषद आझाद उर्दु शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकुन ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते व ३४ ही विद्यार्थि उत्तीर्ण झाले. शाळास्तरावर मोहम्मद अब्दुल्ला मकबुल अहेमद याने ७४.२० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. तर अर्शिया कौसर अब्दुल मुश्ताक हिने ७३.८० गुण घेऊन व्दितीय व राहेमीन अंजुम अब्दुल वहीद हिने ७२ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकाविला. शाळेतील ३४ पैकी १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई - वडील, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अब्दुल करीम देशमुख, सहाय्यक शिक्षक ए.एच. पठाण, विकार शाह, अर्शिया जबीन, मो. वसीम यांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे सह शिक्षण सभापती व इतर नगरसेवकांनी अभिनंदन केले आहे. तसेच शाळेच्या या यशाबद्दल समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment