अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर न.प.च्या कार्यप्रणालीकडे कोणाचेही लक्ष नाही.सर्वत्र कामाचा गोंधळ चालू आहे.कोट्यावधी रूपये पाण्यासाठी खर्च झाले आहेत,पण जनतेच्या समस्या वाढतच आहे.
शहरातील राजकीय पूढारी दूर्लक्ष करीत आहे,तसेच न.प मधील पदांधीकारीही सूस्त बसले आहे.पाणी योजनेत अनेक गैरप्रकार आधीच झाले आहे.चंन्द्रभागा प्रकल्पाच्या कारभाराचीही चौकशी थंडबस्यात पडली आहे .पाणी योजनेची देखभाल करण्यासाठी न.प जवळ सक्षम अधीकारी नाही,तसेच शहरात सर्वत्र पाईपलाइन टाकली पण खड्डे तसेच सोडले आहे.संबंधीत ठेकेदाराकडे लक्ष कोणी देत नाही.या योजनेतही पाणी मूरत असून आता मूरलेले पाणीच जमीनीतून बाहेर निघत आहे हेच म्हणावे लागेल.न.प ची गलथान कार्यप्रणाली याला जवाबदार आहे .याचेच जिवंत उदाहरण म्हणजे अचलपूर परतवाडा रोडवर चेडे एंटरप्रायजेस जवळ पाईप लाईन टाकण्यासाठी गड्डा खोदण्यात आला व तेथील पाईपलाईन पाहिजे तशी काळजीपूर्वक लावण्यात आली नाही त्याचा परिणाम आज ती पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे.रस्त्यावर पाणी साचुन रहदारी विस्कळीत झाली.विशेष म्हणजे या परिसरात जवळच विभागाचे नगरसेवक राहतात येथून नगरसेवक, नगरपालिका पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र येणे जाणे करतात मात्र अश्या गलथान कामाकडे कुणाचेच लक्ष नाही.या नादुरूस्त पाईप लाईन पासून काहीच अतंरावर पाणीपुरवठा कार्यालय सुध्दा आहे.एकिकडे लोक पाण्याची वाट बघत आहे तर दुसरीकडे निरर्थक हजारो लिटर पाणी केवळ रस्त्यावर वाहत आहे याकडे शासन व प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.

Post a Comment