BREAKING NEWS

Monday, June 26, 2017

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार – सुनील तटकरे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य हे आपले एक महिन्याचे वेतन राज्यातील शेतकऱ्यांसाठी देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात काल दिल्ली येथे आदरणीय शरद पवार साहेबांसमवेत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. या चर्चेचे फलित बघता सरकारकडून असलेला प्रस्ताव आणि पवार साहेबांनी सुचवलेल्या बऱ्याचशा बाबींचा समावेश आजच्या कर्जमाफीत झालेला दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे. कर्जमाफी संदर्भात एक लाखापर्यंतची कर्जमर्यादा दोन लाखांपर्यंत वाढवण्याचा आग्रह आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धरला होता. परिणामस्वरूप राज्य सरकारने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ज्यांचे कर्ज दीड लाखांपेक्षा अधिक होते त्यांचे कर्ज वन टाइम सेटलमेंट मध्ये रूपांतरीत केले जाणार आहे. ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहे त्यांना २५ हजारांपेक्षाही अधिक अनुदानाची आमची मागणी होती. परंतु राज्य सरकार २५ हजारांच्या अनुदानाबाबत ठाम राहिले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधात उचललेले हे पहिले पाऊल आहे. मात्र सरकारच्या प्रत्येक घोषणेच्या अंमलबजावणीसाठी आम्ही सतर्क राहून प्रयत्न करू. यामध्ये काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल. किमान आधारभूत किमंत देण्यासाठी आम्ही सूचित केल्याप्रमाणे राज्य कृषी मूल्य आयोग तातडीने नेमला पाहिजे. अडीच वर्षांपासून आयोग नेमलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे मी आज जाहीर करतो.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.