नाफेडच्या तुर खरीदीच्या आंदोलनानंतर शिल्लक रहिलेली शेतकऱ्यांची सर्व तुर शासन खरेदी करेल असे आश्वासन शासनाने शेतकऱ्यांना दिले होते. त्या प्रमाणे शेतकऱ्यांना कूपनचे वाटपही करण्यात आले. परंतु महीना उलटून ही शासनाने अद्याप तुर खरेदी सुरु न केल्याने तालुक्यातील एकूण १७२४ शेतकऱ्यांची 33 हजार क्विंटल तुर घरीच पडली आहे. आज-उद्या खरेदी सुरु होईल असी आस शेतकऱ्यांना आहे.
सविस्तर वृत्तानुसार नाफेडच्या तुर खरेदी आंदोलना नुसार शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी शासनाने 16 में 2017 रोजी कूपन पद्धतीची भन्नाट आइडिया शोधून काढली व शेतकऱ्यांचे तुर खरेदी आंदोलन शांत केले होते. त्यावेळी तुर उत्पादक शेतकऱ्यांचे सात बारा, पेरे पत्रक व मोबाईल नंबर घेऊन लवकरच तुर खरेदीचे आश्वासन दिले होते. परंतु तालुक्यातील तब्बल १७२४ शेतकऱ्यांनी कूपन घेत आपला माल घरीच भरून ठेवला आहे. आज पेरणीची लगबग सुरु झाली असुन अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला तुर खरेदीसाठी फोन आलेला नाही. यावरून कूपन देऊन शासनाने केवळ वेळ मारून नेला की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे. एकीकडे शेतकऱ्याने पिकविलेल्या कुठल्याच मालाला शासनाने योग्य भाव दिला नाही. त्यात नगदी पिक असलेल्या तुर व सोयाबीन पिकाचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात पेरणीसाठी पैसा कुठून आणावा या विवंचनेत शेतकरी वर्ग दिसत आहे. तर परिस्थीति लक्षात घेऊन अनेक शेतकरी आपली तुर कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विकताना दिसत आहे. कधीकाळी 10 ते 12 हजार जाणारी तुर नाइलाजाने तिन हजार भावाणे शेतकरी विकत आहे.
तुरीचा अजूनही चुकारा नाही
22 एप्रिल नंतर नाफेडची तुर खरेदी बंद झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने तुर खरेदी केली होती. तालुक्यातील 156 शेतकऱ्यांची एकूण 2321 क्विंटल तुर खरेदी केली. पण अद्यापपर्यंत त्याचे पैसे मात्र शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे समजते. एकूण 1 कोटि 17 लाख रुपयांचा चुकारा शासनाकडून शेतकऱ्यांना होने बाकी आहे. सद्यास्थितीत शेतकऱ्यांना पैशाची गरज असतांना आपल्याच मालाचे महाराष्ट्र शासनाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
Post a Comment