Wednesday, June 7, 2017
आमल्यात आदर्श विवाह सोहळा खर्चाला फाटा देत साध्या पध्दतीने विवाह पार
Posted by vidarbha on 2:35:00 PM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान /- | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-
तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे अत्यंत साध्या पध्दतीने आदर्श विवाह सोहळा पार
पडला.या नवविवाहित दाम्पत्यांनी बँडबाजा व इतर अवास्तव खर्च बाजुला सारून अत्यंत साध्या
पध्दतीने विवाह करून एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला.
आमला विश्वेश्वर येथील अशोक सिताराम केने यांचा मुलगा प्रविण यांचा विवाह त्याच
गावातील एकनाथ उपरीकर यांची मुलगी काजल हिच्याशी ठरला. ६ जुनच्या मुहूर्तावर हा
विवाह आमला विश्वेश्वर येथे पार पडला. वधु व वर पक्षांनी सर्व ताम झाम, बँडबाजा बाजुला
सारला. स्थानिक चिंतामनी मंदिरात वर-वधूनी एकमेकांना गळ्यात पुष्पहार टाकुन एकमेकांना
आपले जीवनसाथी निवडले. लग्नानंतरही आलेल्या पाहुण्यांना फराळ व चहापाणी देण्यात
आले. एकीकडे खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी व लग्नासाठी कर्ज काढुन कर्जबाजारी होणारे
अनेक पालक आपण समाजात पाहतो. त्याचवेळी साध्या पध्दतीने विवाह करणारे नवविवाहित
तरूण दाम्पत्य एक आदर्श निर्माण करीत आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार
अशोक केने, एकनाथ उपरीकर, प्रमोद केने, मनोहर केने, अनिल उपरीकर, संजय बनकर,
प्रदिप तिखे, मनोज भोजने, सुनिल केने, नरेंद्र आदमाणे, नितीन केने, देविदास नंदरधणे, उमेश
केने, माणिक केने, सुदाम केने, देवानंद पवार, किशोर मोंडे यांच्यासह मुला-मुलीकडील
नातेवाईक मंडळी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment