महेंद्र महाजन जैन /-
रिसोड-
रिसोड-
प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय रिसोड येथे योग दिवस साजरा करण्यात आला योग दिनाच्या निमित्ताने आयोजित योग साधना शिबिराच्या अध्यक्षा व मार्गदर्शिका राजयोगिनी ब्रह्मा कुमारी ज्योती दीदी तर प्रमुख अतिथी यशवंतराव देशमुख नगराध्यक्ष,सुधाकर पानझाडे मुख्याधिकारी नगर परिषद रिसोड,विजय रत्नपारखी साहाय्यक पोलीस निरीक्षक, डॉ राधेश्याम लढ्ढा,अल्काताई रावसाहेब प्राचार्या भा मा कन्या शाळा,प्रा डॉ प्रवीण हाडे,खुळे पोलीस उपनिरीक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन ब्रह्मा कुमारी गीता दीदी,वंदना दीदी व वर्षा दीदींनी यथोचित सत्कार केला. विद्यालयाचा परिचय देताना गीता दीदींनी प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सुरवात १९३७ साली झाली ८०वर्ष सातत्याने ईश्वरिय ज्ञान देण्याचे श्रेष्ठ कार्य विद्यालयाकडून केल्या जात आहे.डॉ राधेश्यामजी लढ्ढा यांनी राजयोग हा सर्वच मानवजातीकरिता कल्याणकारी आहे आजच्या काळात अधिकतम लोकांना मानसिक शांतीची गरज आहे ताण तणावामुळे झालेले ९५%आजार शारीरिक नसून मानसिक आहेत त्यावर नियंत्रण राजयोगामुळे मिळविता येते म्हणून राजयोग हा प्रत्येक व्यक्तीने जाणून घेऊन स्वतःचे स्वास्थ व आत्मशांती प्रस्थापित करावी असे डॉ लढ्ढा यांनी उपस्थितांना मसर्गदर्शन केले. प्रसंगी विजय रत्नपारखी,मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे,अल्काताई रावसाहेब इत्यादींची समायोचित भाषणे झाली राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी मार्गदर्शन करतांना राजयोगाची महती सांगितली माणूस साधारणतः चार प्रकारे विचार करतो सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, आवश्यक विचार ,व्यर्थ विचार,राजयोगामुळे सकारात्मक विचार प्रत्यक्षात जीवनात उतरविता येतात.
राजयोग हा श्रेष्ठ योग असून मन आणि बुद्धीला एकाग्र करून आत्म्याचा संबंध परमात्म्याशी जोडणे म्हणजे राजयोग होय. ज्योती दीदींनी उपस्थितांना प्रत्यक्ष योग साधना करण्याचा सराव करवून घेतला दिदींच्या सुमधुर वाणीतुन ज्ञान सांगताना उपस्थित तल्लीन होऊन ग्रहण करीत होते.विद्यालयातून दिले जाणारे ज्ञान व राजयोग हा सर्व धर्म,जाती,पंथातील व्यक्ती निशुल्क आत्मसात करू शकतात इच्छुकांनी सात दिवशीय कोर्स करण्याचे आवाहन ज्योती दीदींनी केले उपस्थितांना केले. योग साधना शीबिराच्या कार्यक्रमाचे संचालन रवि अंभोरे यांनी केले तर आभार भागवत घुगे यांनी मानले
कार्यकर्माच्या यशस्वीते करिता विद्यालयातील ब्रह्मा कुमार,कुमारीनी परिश्रम घेतले.

Post a Comment