अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
माजी सैनिक व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्थानीक जगदंब महाविद्यालयात 7 जून रोजी मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विणकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमाकांतजी शेरकार प्रमुख अतिथी सैनिक कल्याण अधिकारी अमरावती,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पि.जी.रोहनकर,सेवानीवृती विस्तार अधिकारी देवीदासपंत घु्लक्षे,संघटनेचे अध्यक्ष वानखडे,निकेश दाभाळे व प्रमोद नैकेले यांनी मार्गदर्शन केले या मेळाव्याचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अमरावती व माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन व आभार सुभेदार पठारे यांनी केले.मेळाव्यात माजी सैनिकांच्या विविध समस्यावर मार्गदर्शन करण्यात आले.जसे माजी सेविकांच्या पाल्यांना मिळत असलेल्या सवलती व फी माफी काही शिक्षण संस्थेत दिल्या जात नाही,माजी सैनिकांना मिळणारे लाभ बरोबर मीळत नाही,आरोग्य सेवा,कँटींग सुविधा,पेन्शन या व अशा अनेक समस्यावर चर्चा झाली त्याचप्रमाणे इतर समस्या सुध्दा मांडण्यात आल्या यावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी समाधान कारक उत्तर देत सुचित केले की आपल्या कोणत्याही समस्या असल्यास जिल्हा कार्यालयात सर्व कागदपत्रासह घेऊन याव्यात आपण त्यांचे निवारण करून आपणास न्याय मिळवून देऊ.तसेच काही सैनिकांनी आपल्या रेकाँर्डला वारसदारांची माहिती दिली नाही व पत्नीचे नाव आधारकार्ड प्रमाणे नाही त्यांनी त्या दुरुस्ती करून घ्याव्यात.
तसेच सवलती व सुविधांची माहिती ठेवून त्यांचा लाभ घ्यावा.पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुणे,औरंगाबाद सारख्या शहरात वसतिगृह आहेत त्यांचा लाभ घ्यावा.सैनिकाकरीता विश्रामगृह आहेत त्याचा उपयोग करावा.तसेच वानखडे यांनी संघटने सोबत स्वताला जोडून घ्यावे.मेळाव्यात उपस्थिती चांगली आहे पण पुढे प्रत्येकाने जास्तीतजास्त सहका-यांना आणण्याचे प्रयत्न करावे.अध्यक्षीय भाषणात रमाकांत शेरकार यांनी सर्वांचे अभिनंदन केले व या पुढे कोणताही कार्यक्रम अथवा मेळावा आपल्या महाविद्यालयात आयोजित करून आम्हाला सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी असे प्रतिपादन केले व समस्या मांडतांना त्या लेखी स्वरुपात व पुर्ण पुराव्यानिशी दिल्या तर वरिष्ठांना त्या समजून घेण्यास व सोडवण्यास सोईस्कर होते.आजकाल सवलती व बदलले नियम,शासन निर्णय नेटवर उपलब्ध आहेत आपल्याला समजत नसल्यास इतराकडुन घेऊन समजावून घ्यावे व त्यांचा उपयोग घ्यावा.मेळाव्यात बहुसंख्य माजी सैनिक महिला व पुरुष उपस्थित होते.
Post a Comment