अमरावती / सुरज देवहाते /--

अमरावती मधील पार्वती नगर मधील विविध समस्यांसाठी सदर परिसरातील नागरिक आज १९ मे रोजी अमरावती महानगर पालिके समोर "बैठा सत्याग्रह " ला बसले होते प्रचंड उन आणि डोक्यावर आम आदमी चा टोप्या यात जवळपास दीडशे चा वर कार्यकर्त्ये व नागरिक उपस्थित होते यावेळी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली एक प्रकारे मनपा आम आदमी मय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले , यावेळी कार्यकर्त्यांनी नवनियुक्त मनपा आयुक्त श्री हेमंत पवार यांची भेट घेतली व चर्चा केल्यानंतर त्यांनी असे म्हटले कि मला सध्या 2 दिवस झालेत नियुक्त व्हायला तुम्ही 15 दिवस थांबा मी यात लक्ष घालून तुमचे प्रश्न निकाली काढतो , श्री हेमंत पवार यांनी आंदोलन कर्त्यांना 6 जून पर्यंत चा वेळ दिला आहे 6 जून परत चर्चे साठी या असे आयुक्त यांनी त्यांना सांगितले . आदिवासी होस्टेल पासून ते पार्वती नगर चौकापर्यंत तसेच स्थानिक प्रशांत ट्रेडर्स ते गजानन महाराज मंदिर पर्यंत पक्का रस्ता करणे , नाल्या पक्या करणे , काही ठिकाणी रोज साफ सफाई होत नाही ती व्यवस्थित करणे व प्रशासनाची कुंभकर्णी झोप मोडण्याकरिता आकोली रोड परिसरातील नागरिक व आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्त्ये यांनी "बैठा सत्याग्रह " केला आहे मागील 15 वर्षापासून परिसरातील नागरिक सदर समस्येसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत मात्र कुठलीही समस्या सुटायला तयार नाही , सदर रस्त्याची कामे हि पावसाळ्यापूर्वी व्हावी अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे 28 फेब्रुवारीला याच बाबतीत आम आदमी पक्षातर्फे पालकमंत्री श्री प्रवीण पोते व बडनेरा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री रवी भाऊ राणा व महापौर यांचा कडे सतत याच संदर्भात पाठपुरावा या आधी केला आहे . "बैठा सत्याग्रह " चे नेतृत्त्व आम आदमी पक्षाचे , बशीर शेख , सुधीर ढाकुलकर , प्रवीण शेगोकार , संजय शहाकार , वसंत पाटील , वीरेंद्र उपाध्याय , मोबीन खान , चंद्रशेखर कुरळकर , अतुल वानखडे , अधिवक्ता -श्री नितीन उजगावकर व सर्व कार्यकर्त्ये व स्थानिक परिसरातील नागरिक त्यात प्रामुख्याने अनिल भोंडे , सुनील सोळंके , पांडे साहेब , पंढरी ठाकरे , अशोक धोटे ,प्रवीण इचे , प्रकाश राठोड , संजय भाकरे , प्रदीप भोकरे , निलेश लेंडे , गोपाल खानझोडे , रौराळे , सुनील लिखार , गणेश पाडर, विनोद लाहे , रामशंकर वानखडे , सदाशिवराव वानखडे , नितीन कन्हेरकर आदी नागरिक सहभागी होते.
Post a Comment