रंगय्या रेपाकवार /
अहेरी/--:- येथील साईंकिरण रापर्तिवार या युवकास हाडाच्या कॅन्सरने ग्रासले आहे.ह्याची माहीती मिळताच अहेरीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल गुडेल्लीवार यांनी त्यांच्या मातोश्री पद्माताई गुडेल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या ६ व्या पुण्यस्मरनदिनी.. कँसरग्रस्त साईंकीरण याच्या उपचारासाठी हेल्पिंग हॅंड्स सामाजिक सेवा संस्थेला ५ हजार रुपये दान दिले.. आज ही आर्थिक मदत साईकिरण कड़े सुपुर्द करण्यात आली.. मागील अनेक दिवसांपासून हेल्पिंग हॅंड्स सामाजिक सेवा संस्था अहेरी तर्फे कैंसरग्रस्त साईंकिरण च्या उपचारासाठी पुढाकार घेत आहे. आर्थिक मदत करतांना सामाजिक कार्यकर्ते अमोल गुडेल्लीवार, हेल्पिंग हॅण्ड्स चे प्रतिक मुधोळकर, शंकर मगडीवार,मयूर गुम्मुलवार आदि उपस्थित होते....
Post a Comment