BREAKING NEWS

Tuesday, June 7, 2016

शहिद जवान श्री शेखर बाळस्कर यांचे पार्थीव शरीरावर शासकिय ईतमामात अंतिम संस्कार

आर्वी/
                                  पूलगाव येथील सीएडी कॅम्प अग्नीकांडात शहीद झालेले शेखर बाळस्कर यांचे पार्थीव मंगळवार (ता.7) सकाळी 10 वाजता पिंपळा (पू) त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी (ता.30) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती.आग विझविण्याचा प्रयत्न करीत असताना  तालूक्यातील पिंपळा(पू)येथील शेखर गंगाधर बाळस्कर वय 27 हे शहिद झाले.घटने नंतर डि.एन.ए.चाचणी केल्यानंतर शेखर बाळस्कर यांच्या मृतदेहाची ओळख पटली.शहीद शेखर यांचे पार्थीव सीएडी कॅम्प प्रशासनाचे शंकर भगवान खोब्रागडे पथक प्रमूख व पाच जवानाच्या उपस्थितीत त्याचे पार्थीव घरी आणण्यात आले.सीएडी कॅम्प च्या वतीने त्यांच्या कूटूंबियांना 20 हजार नगदी व 10 हजार रूपयाचे धनादेश देण्यात आला.शहीद शेखर बाळस्कर यांचे पार्थीव शरीर अंतिम दर्शनाकरीता घरासमोर ठेवण्यात आले.स्वर्गरथावर शहीद शेखर यांचे पार्थीव ठेवण्यात आले.तिरंगा दोन्ही बाजूनी लावण्यात आला.अनेक सामाजिक संघटनांनी पूष्पचक्र अर्पन करून आदरांजली वाहली.शोकाकूल वातावरणात त्यांची अंतीम यात्रा काढण्यात आली.ही अंतीम यात्रा त्यांच्या निवासस्थानाहून निघून वर्धा रोड,बसस्थानक परीसर,शिवाजी चौक,पद्मावती चौक ते पूलगाव रोड मार्गे स्थानिक हिंदू स्मशान भूमी येथे नेण्यात आली. त्यानंतर स्थानिक मोक्षधाम येथे राष्ट्रगीत म्हणून वर्धा मूख्यालयाचे  पोलीस पथकाने गार्ड ऑफ ऑनर ची सलामी देण्यात आली.शहीद शेखर अमर रहेच्या घोषणा दिल्या. शासकिय ईतमामात व शोकाकूल वातावरणात त्यांचे पार्थीव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात आले.शेखरच्या अंतीम दर्शनासाठी आमदार अमर काळे,महसूल प्रशासनाचे वतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी मनोहर चव्हाण,शिवसेना जिल्हा प्रमूख निलेश देशमूख,बाळा जगताप,बाळा नांदूरकर,अनिल जोशी,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व आर्वीकर नागरीकांनी त्यांचे अंतीम दर्शन घेतले.आर्वीतील व्यापार्यांनी शहीद शेखर ला श्रद्धांजली म्हणून आपली प्रतीष्ठाणे बंद ठेवली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.