मुंबई, ३० जुलै (वार्ता.)
काँग्रेसचे शासन असतांना हिंदूंचे संत आणि नेते यांना अटक करण्यात आली.
त्यांची सुटका व्हावी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना न्याय मिळावा, यासाठी
जनतेने हिंदुत्वनिष्ठ सरकार निवडून दिले; परंतु या हिंदूंचे सरकार येऊनही
हिंदु संत आणि नेते यांची सुटका अजूनही न झाल्यामुळे हिंदु जनतेची घोर
निराशा झाली आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास येत्या निवडणुकांत सरकारला
त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील, अशी चेतावणी ३५ हिंदुत्वनिष्ठ
संघटनांनी २८ जुलै या दिवशी आझाद मैदान येथे आंदोलनाद्वारे दिली.
हिंदु संत, धर्माभिमानी आणि हिंदु संघटना यांच्यावरील अन्याय आता
सहन करणार नाही. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना पूज्यपाद संतश्री आसारामबापू,
साध्वी प्रज्ञासिंह, श्री. धनंजय देसाई, सनातन संस्था यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे आहेत. रझा अकादमी आणि तिच्या कार्यावर बंदी घालण्याऐवजी सनातन
संस्थेवर बंदी घालण्याचा विचार निषेधार्ह आहे. देव, देश आणि धर्म यांचा
विचार करून हिंदूंनी अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी संघटित व्हावे,
असे आवाहनही या आंदोलनात करण्यात आले.
आंदोलनातील सहभागी संत, महंत, धर्माभिमान्यांची नावे...
साध्वी प्रज्ञासिंह यांचे भावोजी श्री. भगवान झा, धनंजय देसाई यांच्या
बहीण सौ. रूपाली मराठे आणि वडील जयराम देसाई, भाग्यनगर येथील स्वामी रुद्र
गुप्त पादाचार्य, संतश्री आसारामजी बापू आश्रमाचे रामाभाई, प.पू. नारायण
साई आश्रमाचे भावेशानंदजी, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, हिंदु विधीज्ञ
परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, अखिल भारतीय हिंदु
महासभा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष निखिल वर्मा, हिंदु जनजागृती
समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ता
श्री. अभय वर्तक, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. अनुप
केणी, स्वराज्य हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुशील तिवारी, इंडिया
अगेंस्ट इस्लामिक स्टेटचे संपादक श्री. पारस राजपूत, श्रीशिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानचे मुंबई अध्यक्ष श्री. बळवंतराव दळवी, श्री. अनंत करमुसे,
मातृभूमी प्रतिष्ठानचे श्री. जितेंद्र हजारे, नवतरुण मित्रमंडळाचे श्री.
भावेश म्हात्रे, श्री बजरंग सेवा दलाचे श्री. सूर्यभान सिंग, भारतीय नारी
शक्तीच्या अध्यक्षा अलपा पटेल, श्रीराम सेवा संघाचे श्री. जगजीत सिंग,
महाराणा प्रताप बटालियनचे श्री. अजयसिंग सेंगर, स्वराज्य मावळा
प्रतिष्ठानचे श्री. गुरुनाथ मुंबईकर, भारतीय युवा हितकारी संघटनेचे श्री.
सचिन गायकवाड, भारतीय युवा शक्तीचे श्री. देवेंद्र मिश्रा, हिंदुराष्ट्र
सेनेचे श्री. आदित्य देशमुख आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ देवांग पारिख, विशाल
पटनी
Post a Comment