BREAKING NEWS

Tuesday, December 6, 2016

मुंबईत जर राम मंदिर स्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानकही नाही !

गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन 
रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवणार्‍या अबू आझमी आणि 
नवाब मलिक यांना वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांची चेतावणी ! 

       मुंबई - राम मंदिर हा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. आम्ही अबू आझमी आणि नवाब मलिक यांना विनंती करतो की, कृपा करून आपण राम मंदिर नावाचे राजकारण करू नये. जर आपण राम मंदिर रेल्वेस्थानकाला विरोध दर्शवला किंवा आंदोलन केले, तर वीर सेना सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने सनदशीर मार्गाने मज्जीद रेल्वेस्थानकाला विरोध करेल. मुंबईमध्ये जर राम मंदिर रेल्वेस्थानक नाही, तर मज्जीद रेल्वेस्थानक नाही, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी दिली आहे. गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, हे नाव देण्यात यावे, यासाठी २२ ऑक्टोबर २०१५ पासून अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू करण्यात आले आहे. अखेर या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्यास राज्य शासनाने संमती दर्शवली असून त्याविषयीचे अधिकृत पत्र २५ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे; मात्र समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी राम मंदिर नावाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्‍वभूमीवर वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी वरील चेतावणी दिली. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.