![]() |
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना ग्रंथ भेट देतांना श्री. आनंद पाटील |
कोल्हापूर - पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ - पुरीपीठाधीश्वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले आहेत.
६ डिसेंबर या दिवशी सकाळी अधिवक्ता रवि शिराळकर यांच्या घरी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच त्यांना ११ डिसेंबर या दिवशी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण दिले. या वेळी शंकराचार्यांना अध्यात्म विश्वविद्यालय (इंग्रजी आवृत्ती) आणि राष्ट्र और धर्म चिंतन (हिंदी आवृत्ती) हे दोन ग्रंथ भेट देण्यात आले. शंकराचार्यांनी तात्काळ हे दोन ग्रंथ चाळले आणि सनातन संस्थेसाठी माझे नेहमीच आशीर्वाद आहेत, असे सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सौ. वसुधा दिवाण, श्री. आनंद पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे उपस्थित होते.

Post a Comment