अमरावती /---

व्हॉट्सअँपवर या सोशल साईट वर आलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे धार्मिक भावना दुखावले गेलेल्या समुदायाकडून एसटीवर दगडफेक केल्याची घटना फ्रेजरपुरा पोलिसठाण्यांतर्गत येणार्या चपराशीपुरा परिसरात गुरुवारी दुपारी घडली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. चपराशी पुरा भागात या आधीही whatsapp मुळे असले प्रकार झालेले आहे
फिर्यादी शोयब अली हा शहरातील एका व्हॉट्सअँप ग्रुपचा सदस्य असून, त्या व्हॉट्सअँप ग्रुपवर एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखाविणारा संदेश गुरुवारी सकाळी आला. त्यामुळे संतप्त जमावाने फ्रेजरपुरा पोलिस ठाणा गाठून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली.
दरम्यान पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना परत पाठविले. दरम्यान दुपारी चार ते पाचच्या दरम्यान विशिष्ट समाजातील तरुणांनी चपराशीपुरा परिसरात औरंगाबाद- चांदूररेल्वे बस क्र.MH/४0/ वाय/५७८४ या बसवर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी वेळीच पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिस उपायुक्त शशीकुमार मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. एसीपी मिलिंद पाटील, पीआय प्रमेश आत्राम परिस्थतीवर लक्ष ठेवून आहे

Post a Comment