प्रमोद नैकिले/-- अचलपूर:-/--अचलपूर आगाराच्या बसेस भंगार असल्याचे वारंवार दिसून आले आहे आता तर चक्क अंगावर पाणी टपकत असल्याने प्रवासी बसमध्ये छत्री अंगावर घेऊन प्रवास करत असतांना दिसत अचलपूर आगाराची परतवाडा अमरावती बस क्रं.एम.एच.40 एन.8065 पाच जुलै रोजी 11.15 सकाळी परतवाडा बस स्टँड वरून अमरावती ला निघाली रस्त्यामधे वरूनराजाने हजेरी लावली तर काय एस.टी.बसचे छत अक्षरशः गळायला लागले.पाणि एवढं गळायला लागले की एका महीला प्रवास्याने आपली छत्री उघडुन बसावे लागले.त्या महीलेने भ्रमणध्वनी वरून ह्या गैरसोईची सुचना विभागाचे अधिका-यास सुध्दा दिली.आज पर्यंत ब्रेकफेल होने,टायर फुटने,बसफेल होने,बस पैट घेने व अपघात होणे हे या आगाराच्या गाड्यांचे वेळापत्रक होते त्यात पाणि गळण्याचा हा नवीन अध्याय जोडल्या गेला एकीकडे भरमसाठ भाडेवाढ करून प्रवाश्यांचे हे हाल केंव्हा थांबतील हाच प्रश्न जनता महामंडळ व प्रशासनाला विचारत आहे.
Post a Comment