कोल्हापूर--- -

जिल्हाधिकारी अमित सैनी हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जनतेचा आणि हिंदुत्ववाद्यांचा विरोध असतांनाही कारागृहातील महिला कैद्यांकडून प्रसाद बनवून घेणारे आणि श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केलेला चुकीचा वज्रलेप दडपून टाकणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी कोट्यवधी रुपयांच्या चांदीच्या रथातील भ्रष्टाचाराबाबत गप्प का आहेत ? जिल्हाधिकारी देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराविषयी चकार शब्द बोलण्यास सिद्ध नाहीत, याउट केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि पोलीस यांनी उभा केलेला साक्षीदार संजय साडवीलकर याचे नाव त्या घोटाळ्यात आहे; म्हणून अमित सैनी मूग गिळून गप्प बसले आहेत का ? कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रत्येक वेळी पत्रकारांसमोर येणारे संजयकुमार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणात काय प्रगती झाली, याविषयी बोलण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि संजयकुमार या दोघांनी संजय साडवीलकर यांचा भ्रष्टाचार दाबू नये, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे शाहू स्मारक येथे ३ ऑगस्ट या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजिव पुनाळेकर, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी (बंडा) साळोखे, महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीचे सदस्य तथा बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीचे प्रवक्ता श्री. सुनील घनवट, सदस्य श्री. प्रमोद सावंत आणि अधिवक्ता समीर पटवर्धन हेही उपस्थित होते.

Post a Comment