चेन्नई - ख्रिस्ती चांगली कामे करत असली, तरी सेवेच्या आडून ते
धर्मांतरही करत आले आहेत, असा आरोप योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. ते
म्हणाले, हे लोक सेवा करतात, शाळा, महाविद्यालय आणि दवाखाने चालवतात;
मात्र यांसह ते धर्मांतरही करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत. आम्ही योगाचे
शिक्षण देण्यासह सेवा विनामूल्य देतो; परंतु आम्ही कोणाचा धर्म नाही
पालटला, तर त्यांचे जीवन पालटले. लोक नेहमी ख्रिस्त्यांकडून परोपकार
शिकण्यास सांगतात; परंतु लक्षावधी हिंदु साधू आणि धर्मदायी संस्था अशाच
प्रकारे सेवा देत असतात, असेही बाबा रामदेव म्हणाले.
Post a Comment