BREAKING NEWS

Tuesday, September 27, 2016

जळगाव येथे १२ दिवसांनंतरही कृत्रिम हौदातील मूर्तींचे विसर्जन न झाल्याने हिंदुत्वनिष्ठ संतप्त !


  • हिंदुत्वनिष्ठांची पोलीस अधीक्षकांकडे धर्मद्रोही आयोजकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी ! 
  • दोन दिवसांत श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करून कृत्रिम हौद हटवण्याची मागणी ! 

पोलीस अधिक्षकांना निवेदन देतांना १. श्री. सुनिल घनवट आणि अन्य धर्माभिमानी हिंदू
     जळगाव - धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात अथवा नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करणे योग्य आहे; पण जलप्रदूषण होत असल्याचा कांगावा करत जळगाव महानगरपालिका आणि आर्य चाणक्य संस्था यांनी संयुक्त विद्यमाने सागर पार्क येथे कृत्रिम हौदाची बांधणी केली होती. विशेष म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट हे रसायन कृत्रिम हौदातील पाण्यात मिसळण्यात आले होते. अनंत चतुर्दशी होऊन १२ दिवस उलटूनही हौदातील श्री गणेशमूर्तींचे विघटन न होता श्री गणेशमूर्ती मोठ्या संख्येने पाण्यात तशाच पडून आहेत. या प्रकारामुळे गणेशभक्त आणि हिंदुत्ववनिष्ठ यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून श्री गणेशाची विटंबना चालूच आहे. याविरोधात येथील हिंदुत्वनिष्ठांनी २७ सप्टेंबरला सागर पार्क येथील कृत्रिम हौदाजवळ जमून स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांसमोर या धर्मद्रोही घटनेविषयी निषेध व्यक्त केला, तसेच 'कृत्रिम हौदातील मूर्तींचे त्वरित विधीवत् विसर्जन करावे, तसेच श्री गणेशाच्या विटंबनेस उत्तरदायी असणारे महापालिकेचे आयुक्त जीवन सोनावणे आणि आर्य चाणक्य संस्थेचे अध्यक्ष अतुलसिंह हाडा यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवावा अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन छेडतील', अशी चेतावणीही या वेळी त्यांनी दिली. या वेळी धर्माभिमानी श्री. हर्षित (बबलू) पिपरीया, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्री. दीपककुमार गुप्ता, स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे, शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. 

१. शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धर्माभिमानी श्री. हर्षित पिपरीया यांनी ७ दिवसांपूर्वी, तर रामानंद नगर पोलीस ठाण्यात श्री. मोहन तिवारी यांनी ४ दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. 
२. या प्रसंगानंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी रामानंद पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक श्री. वाडीले यांच्याकडे ४ दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली, अशी विचारणा केली. 
३. वाडीले यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने हिंदुत्वनिष्ठांनी थेट पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. तेथे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्यात येऊ नये, अशी मागणी परखडपणे करण्यात आली. 
पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ, 
तसेच धर्मद्रोह्यांना पाठीशी घालण्याचा संतापजनक प्रकार ! 
     कृत्रिम हौदाच्या माध्यमातून श्री गणेशमूर्तींची विटंबना झाल्याने हिंदुत्वनिष्ठांनी शहरातील २ पोलीस ठाण्यांत आयोजकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करूनही या संदर्भात रामानंद पोलीस निरीक्षकांना विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी धर्मद्रोही आयुक्तांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. सामोपचाराने घेण्याचा सल्ला ते हिंदुत्वनिष्ठांना देत होते. 
     भाविकांनो, कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची कशा प्रकारे विटंबना होते, हे जाणा आणि कृत्रिम हौदाची संकल्पनाच विसर्जित करण्यासाठी प्रयत्न करा ! शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे आवश्यक आहे. तसे न करता मनानेच धर्माचरणाला फाटा देणे, तसेच चुकीच्या संकल्पनांचा पुरस्कार करणे, हे श्री गणेशाच्या अवकृपेला पात्र होण्यासारखे आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.