हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर कित्येक दिवस बंदी होती, तेव्हा
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले कुठे होते ? कि हिंदुत्वनिष्ठांना या देशात स्वातंत्र्य नाही ?
पणजी- देशातील एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर कारवाई करणे चुकीचे आहे. संविधान प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते. वृत्तवाहिनीवर बंदी घालणे अवैध आहेे, असे प्रतिपादन गुजरात येथील पुरो(अधो)गामी लेखक डॉ. गणेश देवी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.मडगाव, गोवा येथे १८ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या दक्षिणायन परिषदेविषयी माहिती देण्यासाठी परिषदेचे आयोजक डॉ. देवी यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.
देशहिताला घातक असे वृत्त प्रसारित केल्याविषयी केंद्रशासनाने एन्डीटीव्हीसह अन्य दोन वृत्तवाहिन्यांवर कारवाई केली आहे. या वृत्तवाहिन्यांचा उल्लेख न करता डॉ. देवी यांनी वृत्तवाहिन्यांवर बंदी घातल्याविषयी केंद्रशासनावर टीका केली. डॉ. देवी म्हणाले, देशातील चित्रपट निर्माते, कलाकार, नाटके आणि लेखक यांच्या विरोधात असहिष्णुता वाढत आहे. देशातील असहिष्णुतेच्या विरोधात लढणे कठीण झाले आहे आणि या पार्श्वभूमीवर देशातील विचारवंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित रहाण्यासाठी एकवटले आहेत. (आसाममधील हिंदूंची व्यथा मांडल्याचे निमित्त करून काँग्रेसच्या सत्ताकाळात हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर कित्येक दिवस बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी गणेश देवी आणि तथाकथित इतर अभिव्यक्ती स्वांतत्र्यवाले कुठे होते ? यांचे पुरोगामीत्व आणि स्वातंत्र्यही स्वार्थीच आहे. - संपादक) डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करणे आणि पुरोगामी विचारांच्या प्रचारासाठी या दक्षिणायन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे.
Post a Comment