BREAKING NEWS

Monday, November 14, 2016

कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक ! - श्री. अभिजीत देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या पिंपरी (पुणे) 
येथील शिबिराने धर्माभिमानी साधनेसाठी कृतीप्रवण ! 


श्री. अभिजीत देशमुख आणि मार्गदर्शन करतांना कु. वैभवी भोवर 
     पिंपरी - कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. कारण त्यांच्या पाठीमागे श्री भवानीमाता, समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद होता. व्यष्टी साधना हा कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याचा पाया आहे. साधनेने स्वतःत पालट होतो आणि त्यामुळे त्या साधकासह त्याच्या संपर्कात येणार्‍या सर्वांना लाभ होतो. आपण सर्वांनी ईश्‍वराच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्यरत व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत देशमुख यांनी केले. येथील बळीराज मंगल कार्यालय येथे १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या शिबिरात केले. 
     शिबिराचे सूत्रसंचालन श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. या शिबिरात पिंपरी-चिंचवड, भोर, जुन्नर, मंचर, पुणे शहर आदी भागांतून ५० धर्माभिमानी सहभागी झाले होते. 

समारोपाच्या प्रसंगी धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेली मनोगते 
 १. श्री. युवराज पवळे - शिबीर चालू होतांना आपले शुद्धीकरण होत आहे, असे वाटत होते. आपण नामजप, प्रार्थना कृतज्ञता यांचा वापर करून समष्टी साधना करणार. 
२. श्री अविनाश देसले - शिबिरामुळे नवीन ऊर्जा निर्माण झाली, असे वाटले. 
३. श्री. अविनाश शेटे - सत्कर्म करण्यासाठी साधना पुष्कळ महत्त्वाची आहे. धर्मासाठी प्रतिदिन १ घंटा देईन. 
४. श्री. सर्जेराव ढोकरे - शिबीर स्थळी श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे, असे जाणवले. 
५. श्री. अनिकेत हराळे - स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची अनिवार्यता लक्षात आली. 
६. श्री. हरिप्रसाद दामले - नामसाधनेत वृद्धी, धर्मशिक्षणवर्गात नियमितता आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला प्रारंभ या ३ गोष्टी करण्याचे ठरवले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.