![]() |
| दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कक्षाला भेट देऊन अंक पहातांना हिंदुत्वनिष्ठ |
ठाणे, मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन !
अधिवेशनाच्या ठिकाणी ‘दैनिक सनातन प्रभात - समस्त हिंदुत्वनिष्ठांचे हक्काचे व्यासपीठ’ असा कक्ष उभारण्यात आला होता. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, राबवलेले उपक्रम, धर्मप्रसाराच्या कृती आदींची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देण्यात आलेली वृत्ते या कक्षावर मांडण्यात आली होती. अधिवेशनाला उपस्थित असलेल्या बहुसंख्य धर्माभिमान्यांनी या कक्षाला आवर्जून भेट दिली. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांना ‘राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीच्या कृती दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्धीसाठी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले !

Post a Comment