सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण
![]() |
| १. शिवसेना शहरप्रमुख श्री. प्रताप चव्हाण यांना निमंत्रण देतांना श्री. सुनील घनवट (उजवीकडून तिसरे) |
![]() |
| २. ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांना निमंत्रण देतांना उजवीकडे श्री. सुनील घनवट |
सोलापूर- येथील शिवसेनेचे प्रमुख
पदाधिकारी यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही बैठका
ठरवू. प्रभागातील बैठकांमध्ये सभेचा विषय मांडा. आम्ही तुमच्या समवेत आहोत,
असे आश्वासक उद्गार येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. प्रताप चव्हाण यांनी
काढले. येथील हिराभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हिंदु जनजागृती
समितीच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात
आले आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सभेचे निमंत्रण दिल्यावर ते याविषयी बोलत
होते.
सभेसाठी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी आशीर्वाद देऊन 'माझ्या
प्रवचनांमधूनही मी सर्वांना सभेला उपस्थित रहाण्यास सांगणार आहे', असे
आश्वासन दिले. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट,
सोलापूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment