BREAKING NEWS

Sunday, January 15, 2017

राजमाता पब्लिक स्कुल आसेगांव येथे सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जंयती संपन्न


अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /--



शिक्षणाची गंगोत्री सर्व सामान्यापर्यंत पोहचवणा-या सावित्रीबाई फुले व हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छ.शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती नजीकच्या आसेगांव येथील राजमाता पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली याप्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती निमित्त राजमाता पब्लिक स्कूल येथे या थोर भारतकन्यांना अभिवादन करण्यात आले त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुदंर वेशभूषा करून प्रेक्षकांचे मन आकर्षित करून टाकले.




सावित्रीबाई यांची वेशभूषा चित्रांशी आखरे,जिजाऊची शरवरी इंगळे तर विद्यार्थ्यांची प्रथमेश इंगळे या छोट्या बालकांनी हुबेहुब साकार केली.याप्रसंगी या बालकांचे आईवडील तसेच पल्लवी उमाळे,आशाताई गोटे व सुगराबी शेख प्रामुख्याने उपस्थीत होते.आमच्या शाळेचा उद्देश गुणात्मक शिक्षण देण्याचा असून विद्यार्थ्यांना बालपणापासून सामाजिक सेवेची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जाते असे शाळेच्या संचालीका यांनी सांगितले तसेच येणा-या मकरसंक्रातीला मातीची सुगळे यांचे पुजन केल्या पेक्षा मातींच्या कुंड्याचे पुजन करावे असा संदेश देऊन आम्ही तसा निर्धार केला असल्याचे प्रीती इंगळे,निता खडसे,रूचा वाटाणे व सर्व शिक्षिका यांनी सांगितले व आपणही ईकोफ्रेंडली मकरसंक्रात साजरी करावी असे आवाहन केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रीतम इंगळे,शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांनी परीश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.