अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-
याप्रसंगी अचलपुर, परतवाड़ा वासी व विद्यार्थ्यांमध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले शहरातील आदिवासी विद्यालय गौरखेड़ा, राष्ट्रिय विद्यालय अचलपुर, मातोश्री गंगाबाई लुल्ला विद्यालय गौरखेड़ा, साईनाथ कॉलानी काण्डली, गुरुकुल कॉलोनी परतवाड़ा या शाळेमध्ये RW प्राडक्शन मुंबई येथून धारावाईकची टीम बाजीराव पेशवा यांचे युद्ध सामग्रीचे प्रदर्शन घेऊन आले व विद्यार्थ्यांना पेशवा यांचे जीवनावर माहिती दिली तसेच विविध प्रश्न विचारत मंनोरजन सुध्दा केले.शिक्षक विद्यार्थ्यांनसोबत काही मजेशीर खेळ खेळून त्यांना धारावाईकचे पोस्टरकँलेडर भेट म्हणून देत हि धारावाईक पहाण्याची विंनती केली.जुळ्या शहरात या टीमला सहकार्य आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन NGO परतवाड़ा यांनी केले. R W प्राँडक्शन मुंबई येथून पेशवा बाजीराव च्या टीममध्ये प्रामुख्याने आशीष पड्डू,मोहित शर्मा, नाना साबले, सचिन शिंदे, सचिन डी शिंदे, विजय काम्बले, कमलेश पाल, उल्ल्हास कदम, संतोष मोहिते तसेच आदिवासी पर्यावरण संघटन चे योगेश खानज़्ज़ोड़े, सुरेश प्रजापति, संजय डोंगरे, ममता डहाके, प्रदीप चांदुरकर, प्यारेलाल प्रजापति यांच्या मदतीने विविध ठिकाणी "पेशवा बाजीराव"चा प्रमो संपन्न झाला.प्रथमच ग्रामीण विभागा मध्ये अशी धारावाईकची टीम आल्याने सगळ्यांना हर्षोल्लास होत होता संपूर्ण नगरवासी व आदिवासी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमचा आनंद लुटला.


Post a Comment