BREAKING NEWS

Tuesday, November 22, 2016

दिग्दर्शकाची जीभ कापणार्‍यास १ कोटी रुपयांचे पारितोषिक देणार !

 
  • टॉयलेट : एक प्रेमकथा चित्रपटातून भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचा अवमान !
  • मथुरेतील संतांचा चित्रपटाला विरोध !
         मथुरा - अभिनेता अक्षय कुमार यांचा आगामी हिंदी चित्रपट टॉयलेट : एक प्रेमकथा याला येथील संतांनी विरोध केला आहे. या चित्रपटाचे येथे चित्रीकरण चालू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह यांची जीभ कापून आणणार्‍यास १ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असेही घोषित केले आहे. येथील नंदगाव आणि बरसाना गाव यांमधील मुला-मुलींचा विवाह होत असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. येथील गावकरी चित्रपटाच्या विरोधात उच्च न्यायालयातही जाणार आहेत. येथील श्रीजी मंदिराचे पुजारी भगवान दास गोस्वामी यांचे म्हणणे आहे की, गेल्या ५ सहस्र वर्षांत बरसाना आणि नंदगाव येथील मुला-मुलींचे एकमेकांशी लग्न लावले गेलेले नाही. भगवान श्रीकृष्ण नंदगावचे होते, तर राधा बरसाना गावातील होती. नंदगावातील प्रत्येक मुलाला सखा आणि बरसानाच्या मुलींना राधाच्या रूपात मानले जाते. त्यामुळे त्यांच्यात विवाह होत नाही. चित्रपटात ही परंपरा तोडण्यात आली आहे. 
१. नुकतीच बरसाना येथे महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यात वृंदावनचे महामंडलेश्‍वर नावलगिरी महाराज म्हणाले, निर्मात्याने या चित्रपटाचे नाव टॉयलेट : एक प्रेमकथा का ठेवले ? त्याऐवजी टॉयलेट : एक स्वच्छता अभियान असे नाव का दिले नाही ? 
२. महंत हरिबोल बाबा महाराज म्हणाले, हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आमचे श्रद्धास्थान असणार्‍या राधा-कृष्णाच्या गावात अशा प्रकारचे नाव घेऊन आले आहे. ही प्रेमभूमी आहे. त्यामुळे त्याच प्रकारचे नाव हवे. नाव पालटले नाही, तर येथे चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही.
३. महंत स्वामी अद्धित्यानंद महाराज म्हणाले, वृंदावनमध्ये मुसलमानसुद्धा आमची धर्मपरंपरा टिकवण्यासाठी त्या विरोधात कृती करत नाहीत; मात्र चित्रपट बनवणारे आमच्या संस्कृतीचा अवमान करत आहेत.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.