पुरी (ओडिशा) -
१. २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे आता काळ्या पैशांत आणखी वाढ होईल. पूर्वी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांसाठी मोठा खोका लागत होता, आता २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे लहान खोकाच लागेल.
२. पंतप्रधानांकडे असणार्या सल्लागारांपेक्षा अधिक हुशार सल्लागार उद्योगपतींकडे आहेत. मुख्यमंत्र्यांचा कारभार प्रशासकीय सेवेतील अधिकारी चालवतात, तर या अधिकार्यांना उद्योगपती चालवतात. आज देशातील काही अधिकारी कारागृहात आहेत.
३. देशातील नेते चोर आणि भ्रष्टाचारी यांचे कारखाने चालवत आहेत. हे नेते आता संतांपेक्षाही स्वतःला मोठे समजू लागले आहेत.
४. भारत एक अंधानुकरण करणारा देश झाला आहे. विदेशात ज्या गोष्टी केल्या जातात, त्यांनाच भारतात मान्यता आणि महत्त्व दिले जाते.
५. आधुनिक उपचार पद्धतीने आजार दूर करण्याच्या नादात अनेक आजार उद्भवत आहेत. विदेशी उपचारपद्धतीत वात, कफ आणि पित्त यांना मान्यता नाही; मात्र शरीर पंचभौतिक आहे. या तीन गोष्टींमुळे शरिरात विकार उत्पन्न होतात. जर येथे कोणी पालट करण्यास सुचवले, तर त्याला लगेच विरोध केला जातो.
६. युवकांना असे वाटू लागले आहे की, संत केवळ घंटा वाजवणेच जाणतात. जर त्यांनी योग्य गुरूंकडून ज्ञान ग्रहण केले, तर त्यांना कोणीही संस्कारी होण्यापासून रोखू शकत नाही.
पंतप्रधान मोदी प्रामाणिक आहेत; परंतु नोटाबंदी हा काळा पैसा रोखण्याचा मार्ग नाही. पंतप्रधानांनी देशातील भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा रोखण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नैतिकता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा देशातील शिक्षणपद्धतीत पालट कला जाईल. अभ्यासक्रमात नैतिकता आणि अध्यात्म शिकवले पाहिजे. सरकार कोणाचा सल्ला घेत नाही. जर अशी शिक्षणपद्धत आणली, तर जगभरात त्याचे कौतुक होईल, असे प्रतिपादन पुर्वाम्नाय पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले, १. २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे आता काळ्या पैशांत आणखी वाढ होईल. पूर्वी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांसाठी मोठा खोका लागत होता, आता २ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे लहान खोकाच लागेल.

Post a Comment