BREAKING NEWS

Sunday, November 13, 2016

नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार स्वाती राजेश उभाळ​

प्रमोद नैकेले /-
अचलपूर:-
अचलपूर नगराध्यक्ष पदाकरीता राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,भाजपा,शिवसेना व प्रहार च्या उमेदवारा सोबतच स्वाती राजेश उभाळ अपक्ष उमेदवार सुध्दा प्रबळ दावेदार म्हणुन मैदानात उतरल्या आहेत.
              नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सरळ जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा आहे.या करिता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना,भाजपा व प्रहार ने आपले उमेदवार उभे केले आहे.अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील जवळपास ८४ हजार मतदार आपल्या पसंतीने
नगराध्यक्ष निवडणार आहेत.प्रत्येक पक्ष मतदारांना आपल्या उमेदवाराकडे आकृष्ट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. राजकीय पक्ष आपल्या कोट्याची मतांचा गठ्ठा घेऊन पुढील यशाबद्दल तर्कवितर्क लावत असतांना शहरातील नामांकीत अस्थिरोग तज्ञ डाँ.राजेश उभाळ पाटील यांच्या पत्नी स्वाती राजेश उभाळ सुध्दा प्रबळ दावेदार म्हणुन मैदानात उतरल्या आहेत.डाँ.उभाळ अस्तिरोग तज्ञ असून विविध सामाजिक संघटनासोबत सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्य करतात.नजीकच्या भिलोना येथील मुळ रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून परतवाडा येथे रूग्नसेवा करिता आहे.भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे व इतर संघटनेचे सोबत विविध सामाजिक कार्य करून सर्वत्र परिचीत आहेत.त्यांनी भारतीय जनता पक्षातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करिता प्रयत्न केला पण काही कारणास्तव त्यांना ही
उमेदवारी मीळू शकली नाही म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उतरलवले आहे.त्यांनी जवळपास शहरातील सर्व प्रभागात आपल्या परिचीत व प्रमुख मतदारांच्या भेटी घेवुन त्यांचे होकार प्राप्त करून आपली उमेदवारी निश्चित केली आहे.तसेच आपल्या नियोजनबध्द प्रचार मोहिमेला प्रारंभ सुध्दा केला आहे.त्यामुळे स्वाती राजेश उभाळ सुध्दा येणा-या निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार ठरू शकतात अशी मतदारात बोलल्या जात आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.